Google AI: आता CT Scan, MRI आणि X-ray ची गरज नाही, AI करणार गंभीर आजारांचं निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:53 PM2023-06-19T15:53:26+5:302023-06-19T15:54:10+5:30

Google AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील काम झटपट आणि अचूकपणे करता येऊ शकतं.  मात्र आता AIच्या मदतीने लवकरच आजारांचा शोध घेता येणार आहे.

No more need for CT Scan, MRI and X-ray, Google AI will diagnose serious diseases | Google AI: आता CT Scan, MRI आणि X-ray ची गरज नाही, AI करणार गंभीर आजारांचं निदान

Google AI: आता CT Scan, MRI आणि X-ray ची गरज नाही, AI करणार गंभीर आजारांचं निदान

googlenewsNext

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील काम झटपट आणि अचूकपणे करता येऊ शकतं.  मात्र आता AIच्या मदतीने लवकरच आजारांचा शोध घेता येणार आहे. तसेच त्यावरील उपचारांमध्येही मदत मिळणार आहे. हा दावा कुणी सामान्य माणसाने नाही तर गुगलचे चिफ एक्झिक्युटिव्ह सुंदर पिचाई यांनी केला आहे.

मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरवर एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ गुगलच्या कुठल्या तरी जुन्या इव्हेंटचा आहे. त्या व्हिडीओमध्ये सुंदर पिचाई गुगल एआयची वैशिष्ट्ये सांगत आहेत. त्यावेळी त्यांनी AI सिस्टिम कशाप्रकारे मेडिकल सेक्टरमध्ये बदल घडवून आणणार आहे, हेही सांगितले आहे.

गुगल एआय लवकरच अनेक विभागांना बळ देणार आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, गुगल एआयच्या डीप अॅनालायझेशनचा वापर करून केवळ डोळ्यांचे रेटिना स्कॅन करून अनेक आजारांचं निदान केलं जाणार आहे. एवढंच नाही तर आजारांचं अनुमानही लावता येणार आहे. त्यासाठी रक्ताच्या नमुन्यांची गरज भासणार नाही. 

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एका युझरने सुंदर पिचाई यांचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, आता केवळ आय स्कॅनिंगमधून अनेक आजारांचा शोघ घेता येणार आहे. सध्या आजारांचा शोध घेण्यासाठी सिटी स्कॅन, एमआरआय, आणि एक्स-रेचा वापर केला जातो.

सुंदर पिचाई यांनी सांगितले की, केवळ एका रेटिना स्कॅनमधून वय, बायोलॉजिकल सेक्स, धुम्रपानाचं व्यसन, मधुमेह, बीएमआय आणि रक्कदाब आदींची माहिती मिळेल. व्हिडिओनुसार प्रत्येक माहितीमध्ये दोन पर्याय दिलेले आहेत. त्यामधील एक प्रीडिक्ट आणि अॅक्चुअल कंडिशन मिळेल. व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की. गुगल एआयच्या माध्यमातून केवळ एक डॉक्टर अनेक मेडिकल रिपोर्टचं विश्लेषण करू शकेल. डॉक्टर २४ किंवा ४८ तासांनंतर रुग्णाची स्थिती काय असेल हाही अंदाज लावू शकतील.

Web Title: No more need for CT Scan, MRI and X-ray, Google AI will diagnose serious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.