ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 09:56 AM2019-05-11T09:56:19+5:302019-05-11T10:01:46+5:30

अलिकडे आपण बघतो की, मोठमोठे ऑफिसेस चारही बाजूने बंद असतात आणि आत कुठेही नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा नसते.

No natural air in office space may have negative impact on health | ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

Next

(Image Credit : The Telegraph)

अलिकडे आपण बघतो की, मोठमोठे ऑफिसेस चारही बाजूने बंद असतात आणि आत कुठेही नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा नसते. पण याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. कारण एसीने त्यांना थंड केलेलं असतं.  तुमचंही ऑफिस चारही बाजूने बंद असेल आणि अजिबातच नैसर्गिक हवा आत येत नसेल तर ही चिंतेची बाब ठरू शकते.  

(Image Credit : Wikipedia) (प्रातिनिधीक फोटो)

एका रिपोर्टनुसार, ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं ही बाब कर्मचाऱ्यांचं आरोग्य बिघडवू शकते. ऑफिसमध्ये व्हेंटिलेशन ने होत असल्याकारणाने कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं. ज्याचा मेंदूवर फार वाईट प्रभाव पडतो. 

(Image Credit : Entreprene)

एका रिपोर्टच्या हवाल्याने न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, व्यक्ती त्याच वातावरणात राहू शकतो, जिथे ऑक्सिजन असेल. जेणेकरून आपण सहजपणे श्वास घेऊ शकू. कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. रूममध्ये कार्बन डायऑक्साइडचं कमी प्रमाण असेल तरी सुद्धा श्वास रोखला जाऊ शकतो. याने मेंदूला मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा निर्माण केला जाऊ शकतो. 

या रिपोर्टनुसार, शरीरातील अंतर्गत अंगांपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचणे, व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर प्रभाव टाकतं. एन्व्हायनरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनुसार, बंद रूममध्ये प्रदूषणाचं प्रमाण २ ते ५ पटीने अधिक वाढू शकतं. या प्रदूषणामुळे हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजारांचा धोका अधिक वाढतो. तसेच यामुळे अकाली मृत्यूचा धोका देखील असतो. 

Web Title: No natural air in office space may have negative impact on health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.