सर्दी पडसं झालं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही...करा साधे सोपे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:52 PM2021-06-21T20:52:23+5:302021-06-21T20:53:15+5:30
दुर्लक्ष केलं तर सर्दी पडसं होऊ शकतं गंभीर, करा हे साधे सोपे घरगुती उपाय.डॉक्टरकडे जाण्याची गरजही नाही...
पावसाळ्यात सर्दी-पडसं होतच. यासाठी आपण लगेच डॉक्टरचा धावा करतो पण यासाठी घरच्याघरी केले जाणारे आर्युवेदिक उपचार आहेत. डॉ अबरार मुल्तानी यांनी झी न्यूज हिंदीला दिलेल्या माहितीत काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत. हे घरगुती उपचार ट्राय करा. अगदी काही तासांतच सर्दी-पडश्यापासून बराच आराम मिळेल.
आलं
आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे सर्दीशी लढायला मदत करतात. आल्यासोबत लिंबू आणि मधाचे सेवन केले गेले तर सर्दी-पडश्यापासून त्वरीत आराम मिळतो.
मध
श्वसन तंत्रामध्ये निर्माण झालेल्या हलक्या समस्यांना मधाच्या माध्यमातून ठीक करता येते. मध एका अँटीबायोटिक प्रमाणे काम करते. सर्दी ठीक करण्यासाठी मधाचा वर केल्याने कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध सहज घरात उपलब्ध असते. त्यामुळे सर्दी खोकल्यावर त्याचा त्वरित वापर करता येतो.
निलगिरीचं तेल
बदलत्या वातावरणानुसार, सर्दी-ताप होत असतो. तुम्हीही सर्दी-तापापासून त्रस्त असाल तर या तेलाचा वापर करा. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे सर्दी-तापाची समस्या दूर होईल. कोमट पाण्यामध्ये दोन थेंब निलगिरीचे तेल घाला आणि त्याने गुळण्या करा.
मीठाचे पाणी
घशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.
तुळस
तुळस आपल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसाठी ओळखली जाते. हिवाळ्यामध्येच नाही तर उन्हाळ्याच्या काळातही जर नाक बंद पडले तर तुळशीचा वापर नाकपुडी उघडण्यास मदत करतो.