पाठांतर होत नाही?- लवकर झोपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:06 AM2021-06-25T10:06:07+5:302021-06-25T10:06:27+5:30

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये झोप आणि स्मृती याचा अभ्यास १९२० च्या दशकात सुरू झाला.

No recitation? - Go to bed early! | पाठांतर होत नाही?- लवकर झोपा!

पाठांतर होत नाही?- लवकर झोपा!

googlenewsNext

- डॉ. अभिजित देशपांडे, 

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये झोप आणि स्मृती याचा अभ्यास १९२० च्या दशकात सुरू झाला. जेनकीन्स आणि डालेन साख या जोडगोळीने  १९२४ साली प्रसिद्ध केलेल्या निबंधात असे नमूद केले की एखादी गोष्ट शिकल्यावर जे लोक शांत, पुरेसा वेळ झोपले त्यांची स्मृती ही जागरण करायची सवय असलेल्या, न झोपलेल्या लोकांपेक्षा जास्त चांगली राहिली. त्या वेळेला त्यांना असे वाटले की जागे राहिल्याने इतर सटर-फटर गोष्टींमुळे कदाचित मेंदू भरला गेल्याने स्मृती कमी झाली असेल. मागील काही लेखांमध्ये मी या बाबींचा उल्लेख केला आहे की ‘REM’ झोपेचा शोध १९५३ मध्ये लागेपर्यंत झोप म्हणजे ‘निष्क्रिय’ अवस्था असा तज्ज्ञांचा गैरसमज होता.  परंतु  १९५३ नंतर मात्र झोपेबद्दल जोराने अभ्यास सुरू झाला. विनसेट ब्लाच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उंदरांवर प्रयोग करून  १९७० साली झोपेमुळे स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो हे सिद्ध केले. 

मागील लेखामध्ये मी झोपेचे दोन वेगळे प्रकार - REM आणि Non REM - सांगितले होते. शास्त्रज्ञांनी विशिष्ट प्रकारच्या झोपेचे कुठल्या  प्रकारच्या स्मरणशक्तीवर काय परिणाम होतील याची चाचणी केली. भावनेशी जुळलेली स्मृती ही REM झोपेमध्ये बलिष्ठ होते, तर शाब्दिक स्मृती ही Non REM झोपेत बलिष्ठ होते. मार्शल या शास्त्रज्ञाने विद्युत आणि चुंबकीय वापर करून Non Rem झोपेतील आवर्तने वाढवली.  हे केल्यानंतर ‘शब्द’ लक्षात राहण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. आमच्या संस्थेमध्ये झोपेसंदर्भात मूलभूत संशोधन होते. काही आयुर्वेदिक औषधे (अश्वगंधा, शंखपुष्पी) आधी घेतल्यावर ही आवर्तने वाढल्याचे आम्हाला आढळले. Non Rem झोप ही रात्रीच्या पूर्वार्धात जास्त येते. ज्यांना पाठांतर करायचे आहे. त्यांना, ‘लवकर निजे’ ही बाब समजणे महत्त्वाचे आहे. 

REM   झोप  (साखरझोप)  आणि दिशा लक्षात ठेवून वाटचाल करायची स्मरणशक्ती (Navigational Memory) यांचे नाते २०१४ साली न्यूयॉर्क विद्यालयात झालेल्या संशोधनाने सिद्ध झाले. वाहन चालक मंडळींना ही स्मृती फार महत्त्वाची ठरते. अनेक अपघात काही विशिष्ट वेळीच होतात  (पहाटे ५ ते ७) याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही Navigational Memory कमी होणे! 

तात्पर्य ‘निरोगी झोप’ ही बळकट स्मरणशक्तीकरिता आवश्यक ठरते!

Web Title: No recitation? - Go to bed early!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.