चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:33 PM2024-09-20T17:33:57+5:302024-09-20T17:40:24+5:30
जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात.
एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात.
हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे आणि तुमच्या आजूबाजूला असे बरेच लोक असतील जे या आजाराचे बळी ठरले असतील. जेव्हा तुम्हाला या आजाराची माहिती मिळेल तेव्हा तुम्ही हैराण व्हाल. या आजाराला नोमोफोबिया असं म्हणतात, म्हणजेच फोन नसण्याची भीती. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना नेहमी भीती वाटते की ते कदाचित त्यांच्या फोनपासून दूर जातील किंवा त्यांचा फोन चोरीला जाईल. फोनची बॅटरी लो होण्याची भीती आहे. यासोबतच अनेकदा त्यांचा फोन तुटण्याची भीती असते. ही एक प्रकारची चिंता आहे जी लोकांना फोनच्या संदर्भात नेहमीच वाटत असते.
फोन हरवण्याची भीती
हा एक दुर्मिळ आजार मानला जात असला तरी आजच्या काळात हा एक अतिशय सामान्य आजार झाला आहे. ज्यांना फोनचं व्यसन आहे त्यांच्या बाबतीत हे जास्त घडतं. द रिकव्हरी व्हिलेज वेबसाइटनुसार, अनेक मुला-मुलींवर एक रिसर्च करण्यात आला, ज्यामध्ये असं आढळून आलं की २३ टक्के विद्यार्थी नोमोफोबिक आहेत. त्यापैकी ७७ टक्के विद्यार्थी दिवसातून ३५ वेळा त्यांचा फोन पाहतात.
लक्षणं काय आहेत?
नोमोफोबियाच्या लक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास, फोनवर वारंवार नोटिफिकेशन पाहणं आणि फोन स्विच ऑफ न करणं यांचा समावेश होतो. सर्व ठिकाणी तुम्ही तुमचा फोन सोबत घेऊन जाणं. पूर्ण चार्ज झाल्यानंतरही फोन पुन्हा पुन्हा चार्ज करणं. तुमच्याकडे फोन आहे की नाही हे पुन्हा पुन्हा तपासणं. आपलं काहीतरी वाईट होईल आणि आपण कोणालाही कॉल करू शकणार नाही याची काळजी वाटणं. वाय-फाय किंवा नेटवर्कशिवाय राहण्याची भीती वाटणं. फोन हरवण्याची भीती वाटणं. या आजारावर औषधांसह अनेक प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत.