एव्हरेस्ट चढला तरी फिट नाही; अचानक Heart Attack नं मृत्यू का होतोय?, समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:50 PM2023-04-07T13:50:42+5:302023-04-07T13:51:23+5:30

जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर काही वर्षांनी त्याचे रुपांतर हार्ट अटॅकमध्ये होते. अनेक जण हेल्थ चेकअपला घाबरतात.

Not fit to climb Everest; Why is sudden death due to Heart Attack?, Know | एव्हरेस्ट चढला तरी फिट नाही; अचानक Heart Attack नं मृत्यू का होतोय?, समजून घ्या

एव्हरेस्ट चढला तरी फिट नाही; अचानक Heart Attack नं मृत्यू का होतोय?, समजून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली - अलीकडच्या काळात अचानक बेशुद्ध होऊन पडणे आणि श्वास थांबणे या घटना वाढल्या आहेत. युवक असो वा स्वत: फिट असणारे लोकही अचानक एक्झिट घेत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. कार्डियक अरेस्ट अचानक येत नाही असं मत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी मांडले आहे. वेळोवेळी आरोग्य चाचणी गरजेची आहे असा सल्ला शेट्टी यांनी लोकांना दिला. 

डॉ. शेट्टी सांगतात की, जेव्हा कुणी सिक्स पॅकवाला सेलिब्रिटीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो तेव्हा माध्यमे खूप हेडिंग देतात. परंतु अचानक कार्डियक अरेस्ट येत नाही. ज्या लोकांचा अचानक मृत्यू झाला त्यांनी १० वर्षापूर्वी कार्डियक स्क्रिनिंग केली होती. कुठला आजार जडला आहे हे चाचणीतून समजू शकते. मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. शहरातील डायग्नोस्टिक लँब्समध्ये स्क्रिनिंग केली जाते असं त्यांनी सांगितले. 

क्रिटिकल ब्लॉकेजवाले जास्त रूग्ण साइलेंट इस्कीमियाने ग्रस्त असतात. अशा रुग्णांना छातीत दुखत नाही. काही याला साइलेंट हार्ट अटॅक म्हणतात. हे थांबवू शकतो. लोक स्वत:ला जेवढे फिट समजतात तेवढे ते आतमधून असतीलच असे नाही. आरोग्य चाचणी करण्यापासून बहुतांश नकार देतात. जर तुम्ही महिन्यातून २ वेळा माऊंट एवरेस्ट चढला असेल तरीही जोपर्यंत तुमची आरोग्य चाचणी होत नाही तोवर तुम्हाला फिट घोषित केले जात नाही. ब्लड टेस्ट, ईसीजी, इकोकार्डियोग्राम, कार्डियक सीटी स्कॅनही बघावे लागते. 

कॉमन स्ट्रेस टेस्टमधून कोरोनरी आर्टरी डिजीज माहिती पडत नाही. हृदयाच्या सीजी एंजियोने ओपीडीत आलेल्या रुग्णाच्या छोट्या ब्लॉकेजचाही माहिती होते. जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर काही वर्षांनी त्याचे रुपांतर हार्ट अटॅकमध्ये होते. अनेक जण हेल्थ चेकअपला घाबरतात. काही वेगळे निघाले तर उपचाराचा खर्च येईल असं वाटते. मेडिकल सायन्सने खूप प्रगती केलीय. परंतु आजाराचे निदान वेळेत व्हायला हवे. देशात होणाऱ्या हार्ट सर्जरीतील १४ टक्के माझ्या ग्रुपच्या हॉस्पिटलमध्ये होतात. अनेकदा रुग्णांना आजारावर उपचार घेताना हार्ट अटॅकबाबत चाचणीत कळते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हार्ट अटॅक जास्त येतो. कुठल्याही आजाराचे निदान शोधण्यासाठी आरोग्य चाचणी करा, त्यामुळे वेळेत उपचार घेणे शक्य होते असं डॉ. शेट्टी सांगतात. 

Web Title: Not fit to climb Everest; Why is sudden death due to Heart Attack?, Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.