केवळ तिची नव्हे, आपली मासिक पाळी; तुम्ही मुलांशी असा संवाद साधता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 01:00 PM2023-05-21T13:00:30+5:302023-05-21T13:04:25+5:30
मुलांना लैंगिक शिक्षण देणं, काळाची गरज
अॅड. प्रवीण निकम,
समता सेंटर, स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक
सध्या महाराष्ट्र झपाटयाने ग्लोबल स होण्याकडे झुकत असला तरी याच महाराष्ट्रात 'मासिक पाळी विषयी अजूनही गैरसमज असल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे कौमार्य चाचणी व त्या आधारित प्रकाराविषयी वादळ उठले •असताना मासिक पाळीच्या गैरसमजामुळे उल्हासनगरमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकाराने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. या परंपरांच्या बेड्या खरं तर कधीच मोडून टाकण्याची गरज होती. पण, अजूनही असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. १२ वर्षांच्या मुलीला पहिली मासिक पाळी आल्याची कल्पना भावाला नसल्याने गैरसमजातून त्याने सख्ख्या बहिणीची हत्या केली. ज्या वयात जगण्याची उमेद मिळावी, भक्कम आधार पाठीशी हवा होता, तेव्हा ती हिंसेची शिकार झाली. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात मासिक पाळी समज -गैरसमज व लैंगिक शिक्षण यावर काम करण्याची विशेष गरज निर्माण झाली आहे.
'लैंगिक शिक्षण' हा शब्द जरी उच्चारला तरी कित्येकांच्या भुवया उंचावतात. पण, लहानपणापासून लैंगिक शिक्षणाविषयी धडे हसत-खेळत देणे आवश्यक आहे. ते योग्य वय काय? हे लैंगिक शिक्षण मुलांना कसे द्यावे? तर आपला मुलगा असो वा मुलगी एक माणूस म्हणून जगताना कोवळ्या वयात आपलेपणाचा विश्वास निर्माण होईल, असे वातावरण घरी निर्माण करावे. वेगवेगळ्या माध्यमांतून मुलांना शरीराची ओळख करून द्यावी आणि लैंगिक अंगांबद्दल समजेल व उमजेल अशा गोष्टी साध्या व सोप्या भाषेत सांगाव्यात. जेणेकरून त्यांना 'आपल्या शरीरावर, आपलाच हक्क आहे' ही जाणीव निर्माण होते. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक सांगावा आणि तो कसा ओळखावा है गोडीने सांगितले तर त्या वयात विश्वासाची जाणीव निर्माण होते. तसेच लैंगिक शोषणाला तेदेखील विरोध करतात. याविषयी शाळेमध्ये अजूनही उघडपणे बोलले जात नाही.
तुम्ही असा संवाद साधता का?
- कित्येक वैज्ञानिक संज्ञाचे स्पष्टीकरण दिले जात १ नाही. त्यामुळे मुलाच्या मनात प्रश्नाचे घर होते. मूल अधिक चंचल व प्रश्नात्मक राहते, तेव्हा ते गुगलसारख्या मित्राचा आधार घेत बसते. याच वयात मुले लैंगिक गोष्टीबाबत अनेक प्रश्नसुद्धा विचारतात.
- २ त्या सर्व प्रश्नाची जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून समस्येचे निराकरण वेळीस झाल्यास मूलदेखील त्या पद्धतीने वागू-बोलू लागते. हळूहळू मूल मोठे होत जाते.
- जाहिरात, चित्रपटातून शारीरिक संबंधाचे दृश्य समोर येतात, तेव्हा त्यास ही जाणीव करून द्यावी की, ३ सेक्स म्हणजे वासना नव्हे. बलात्कार, त्या लैंगिक शोषण व सेक्स यातील फरक समजून सांगावा.
- ४ मासिक पाळी आल्यावर कोणती काळजी घ्यावी, या काळात कोणता त्रास होतो. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर कसा करावा. पाळी आल्यावर मोकळेपणाने बोलता यावे याविषयी संवाददेखील मित्रत्वाच्या नात्याने करावा.
- ही चर्चा फक्त मुलींबद्दल मर्यादित न राहता, मुलांनादेखील या सगळ्यांची जाणीव करून द्यावी.
इंटरनेटचा वाढता वापर.....
- तरुण वयात इंटरनेटचा त्यांचा वापर वाढलेला असतो. पॉर्न बघण, लैगिक शोषण करणारे आकर्षित व्हिडिओ बघणे, त्याविषयी सर्व करून वारंवार वाचण, हे सर्व करायला उत्तेजना निर्माण करणं हे सारे प्रकार घडून येत असतात.
- लैंगिक शिक्षण, लिंगभाव व समानता. या प्रमुख गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर तसे घरात, शाळा-महाविद्यालयात व एकूणच समाजात वातावरण निर्माण होणे ही आताची गरज आहे.
- समानतेने व मित्रत्वाने तिची मासिक पाळी ही फक्त तिची न राहता 'आपली मासिक पाळी आहे, हा विचार पुढे यायला हवा.