हुंदके देऊन रडण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:38 PM2018-08-09T17:38:19+5:302018-08-09T17:43:41+5:30
खुलून हसणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं, असं आपण नेहमीच ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हुंदके देऊन रडणंही शरीरासाठी फायदेशीर असतं.
खुलून हसणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं, असं आपण नेहमीच ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हुंदके देऊन रडणंही शरीरासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊयात हमसून रडण्याचे काही फायदे...
हसणं शरीरासाठी फायदेशीर असतं हे आपल्याला सगळेचं सांगतात पण कधी रडत जा, शरीरासाठी चांगलं असतं, असं कुणीच म्हणत नाही. नेहमीच कोणी रडत असेल तर त्याला शांत केलं जातं. आणि न रडण्याचा सल्ला दिला जातो. पण नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ज्याप्रकारे घामाद्वारे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यातूनही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
एका अभ्यासातून स्पष्ट झाल्यानुसार, स्ट्रेसमुळे रडणं आणि डोळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे रडणं यामध्ये फरक आहे. जेव्हा आपण रडतो तेव्हा शरीरातून एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्यूसीन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात. पण जर डोळ्यांना त्रास होत असेल आणि त्यामुळे जर पाणी बाहेर आलं तर मात्र असं काहीही होत नाही.
अश्रू डोळ्यांमध्ये असणाऱ्या मेमब्रेनला ड्राय होऊ देत नाही. हे ड्राय झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे काहींना कमी दिसण्याची समस्या होऊ शकते. मेमब्रेन जर व्यवस्थित असेल तर डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित असते.
अश्रूंमध्ये लायसोजाइम नावाचं तत्व असतं. जे वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी सहायक ठरतात. यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होत नाही आणि डोळे हेल्दी राहण्यास मदत होते. आपण रडतो त्यावेळीच लायसोजाइम अश्रूंद्वारे डोळ्यांतून बाहेर पडतात.
रडल्यामुळे तणाव दूर होतो. त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. अनेकदा काही लोकं आपला राग आणि ताण मनामध्येच ठेवतात. असे केल्यानं अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. जर ताण नाहीसा करायचा असेल किंवा रडावेसे वाटत असेत तर रडणं गरजेचं आहे. काही लोकांना वाटतं की, रडल्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचेल. पण असा विचार करणं योग्य नाही. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर अनेक लोकं विविध प्रकारची औषधं, योग इत्यादीचा सहारा घेतात. परंतु, असे करण्यापेक्षा रडणं सर्वात चांगला उपाय मानला जातो.