महिलांच्या केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही अॅस्ट्रोजन हार्मोन महत्त्वाचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 10:28 AM2019-05-08T10:28:34+5:302019-05-08T10:55:34+5:30
मानवी शरीरात वेगवेगळे संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स तयार होतात. हार्मोन्स शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने होत.
(Image Credit : London Post)
मानवी शरीरात वेगवेगळे संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स तयार होतात. हार्मोन्स शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने होत. वेगवेगळ्या हार्मोन्सचे वेगवेगळे फायदे आणि तोटे असतात. काही पुरूषांसाठी खास असतात तर काही महिलांसाठी. महिलांच्या आरोग्यासंबंधी असाच खास हार्मोन म्हणजे अॅस्ट्रोजन. स्त्रीत्वाशी संबंधित अनेक गोष्टी या हार्मोनने प्रभावित होतात. इतकेच नाही तर अकाली वृद्धत्व येणं किंवा अधिक वयातही तरूण दिसणं यासाठीही हेच हार्मोन जबाबदार असतात.
काय आहे अॅस्ट्रोजन हार्मोन?
(Image Credit : Johns Hopkins Medicine)
अॅस्ट्रोजन जास्तीत जास्त प्रमाणात ओव्हरीज म्हणजेच गर्भाशयातून तयार होतात. अॅस्ट्रोजनचं प्रमाण कमी असेल तर याचा शरीरातील अवयवांवर प्रभाव बघायला मिळतो. ज्या महिलांमध्ये एनोरेक्सियासारखी इटिंग डिसऑर्डरची(खाण्यासंबंधी विकार) समस्या असते, त्यांच्यात अॅस्ट्रोजनची कमतरता होण्याच्या समस्येचा अधिक धोका असतो.
अॅस्ट्रोजनच्या कमतरतेचं कारण
महिलांमध्ये अॅस्ट्रोजनच्या कमतरतेची वेगवेगळी कारणे असू शकतात. जर एखाद्या कारणाने गर्भाशयाला नुकसान पोहोचलं असेल तर शरीरात अॅस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यासोबतच मेनोपॉजही अॅस्ट्रोजन हार्मोन कमी होण्याचं मोठं कारण आहे. मेनोपॉज येण्याच्या काही वर्षांआधीपासूनच अॅस्ट्रोजनचा स्तर कमी होऊ लागतो. याला प्री-मेनोपॉज स्थिती असंही म्हटलं जातं.
(Image Credit : Vagifirm)
ही कारणेही असू शकतात
- प्री म्यॅच्युअर ओवेरिअन फेलिअर
- थायरॉइड डिसऑर्डर
- प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज करणे
- सतत वजन कमी होत जाणे
- कीमोथेरपी
हे हार्मोन कमी झाल्याने महिलांना होणाऱ्या समस्या
(Image Credit : Daily Mail)
१) अनियमित मासिक पाळी - नियमित मासिक पाळी होण्याचं मुख्य कारण अॅस्ट्रोजन हार्मोन आहे. त्यामुळे अॅस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यावर त्याचा सर्वात पहिला प्रभाव मासिक पाळीवर पडतो.
२) इन्फर्टिलिटी - अस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे ओव्यलेशनमध्ये अडचण येते. त्यामुळे गर्भधारणेत समस्या होऊ शकते.
३) शारीरिक संबंधावेळी वेदना - अॅस्ट्रोजन कमतरता असेल तर व्हजायनल लुब्रिकेशनवरही प्रभाव पडतो. या हार्मोनच्या कमतरतेमुळे व्हजायनात कोरडेपणाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे शारीरिक संबंधावेळी महिलांना अधिक वेदना होतात.
४) हॉट फ्लेश - अचानक घाम येणे आणि फार जास्त गरम होणे यासारखी समस्या महिलांना मेनोपॉजदरम्यान होते. ही सुद्धा अॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे होते.
(Image Credit : Collective Evolution)
५) डिप्रेशन - अॅस्ट्रोजनमुळे सेरोटोनिन नावाचं हार्मोन रिलीज होतं, हा हार्मोन मूड चांगला ठेवण्यास जबाबदार असतो. अॅस्ट्रोजन कमी झाल्यास सेरोटोनिन कमी रिलीज होऊ शकतात आणि त्यामुळे मडू स्वींगचा धोका होतो.
६) यूटीआय - अॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे मूत्रमार्गात असलेले टिश्यू पातळ राहतात. ते विकसित होऊ न शकल्याने यूटीआयचा धोका होऊ शकतो.
वजनावर पडतो प्रभाव
अॅस्ट्रोजन हार्मोन केवळ मासिक पाळीच नियमित करते असे नाही तर महिलांचं वजन नियंत्रित करण्यातही यांची महत्त्वाची भूमिका असते. मेनोपॉजमुळे महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या बघितली जाऊ शकते. सामान्यपणे कंबर आणि मांड्यांवर जास्त चरबी जमा होते.