वजन वाढण्याचं हे मुख्य कारण तुम्हाला माहीत आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:03 PM2018-07-23T13:03:39+5:302018-07-23T13:04:18+5:30

वजन कशामुळे वाढतं याची सतत वेगवेगळी चर्चा ऐकालया मिळते. वेगवेगळे लोक वेगवेगळी कारणं सांगतात. पण चीन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यातून वजन वाढण्याचं मुख्य कारण शोधून काढलं आहे.

Not sugar or carbohydrates but more fats make you fat - Study | वजन वाढण्याचं हे मुख्य कारण तुम्हाला माहीत आहे का?

वजन वाढण्याचं हे मुख्य कारण तुम्हाला माहीत आहे का?

Next

वजन कशामुळे वाढतं याची सतत वेगवेगळी चर्चा ऐकालया मिळते. वेगवेगळे लोक वेगवेगळी कारणं सांगतात. पण चीन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यातून वजन वाढण्याचं मुख्य कारण शोधून काढलं आहे. या अभ्यासात वजन वाढण्याचं मुख्य कारण डाएटमधील असलेल्या फॅट्स हे सांगितलं आहे. 

हा रिपोर्ट सेल मेटाबॉलिज्म या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. हा अभ्यास एका उंदरावर करण्याक आला. या रिपोर्टमधून समोर आलं आहे की, वजन वाढण्याचं कारण आपल्या डाएटमध्ये असलेल्या प्रोटीन आणि सुक्रोज नाही तर डाएटमधील फॅट आहे. 
या अभ्यासाचा मुख्य उद्देश हे जाणून घेणं होतं की, वजन वाढण्यासाठी कोणतं न्यूट्रिएंट सर्वात जास्त कारणीभूत आहे.

अभ्यासादरम्यान अभ्यासकांनी ३० उंदीरांच्या वजनाचं ३ महिने निरीक्षण केलं. अभ्यासकांनी सांगितले की, डाएटमध्ये फॅट जास्त प्रमाणात असल्याने मेंदूतील 'डोपामाइन' आणि 'सेरोटोनिन' हार्मोन्स निघतात. यामुळे लोकांना खाण्यात अधिक मजा येते. आणि लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात. जर डाएटमध्ये फॅटचं प्रमाण कमी असेल तर लोक कमी खातात. 

त्यासोबतच या अभ्यासातून हेही समोर आलं आहे की, डाएटमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण संतुलित असेल तर वजन वाढत नाही. अभ्यासकांनी हा सल्ला दिलाय की, जर तुम्हाला वजन वाढू द्यायचं नसेल तर डाएटमध्ये फॅटचा वापर कमी करा. 

पण सोबतच त्यांनी हेही सांगितले की, वजन वाढण्याच्या भीतीने डाएटमदून फॅट पूर्णपणे दूर करू नका. फॅट असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावीत. कारण शरीराचं मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे चालण्यासाठी फॅटचीही गरज असते. 

Web Title: Not sugar or carbohydrates but more fats make you fat - Study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.