दिलासादायक! जॉनसन अॅण्ड जॉनसनची 'नोवावॅक्स' लस ठरली सुरक्षित; चाचणीनंतर तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:33 AM2020-09-04T11:33:19+5:302020-09-04T11:53:05+5:30
NVX‑CoV2373 लसीची चाचणी १३० निरोगी लोकांवरही करण्यात आली होती
जगभरात एकूण १०० पेक्षा जास्त लसींच्या चाचण्या सुरू आहेत. यातील ८ लसी शेवटच्या टप्प्यातील ट्रायलमध्ये पोहोचल्या आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहे. अमेरिकेतील कंपनी नोवावॅक्सने आपल्या लसीच्या चाचण्यांबाबत माहिती दिली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार NVX‑CoV2373 ही लस चाचणीदरम्यान सुरक्षित ठरली आहे. जॉनसन अॅण्ड जॉनसन कंपनीनं कोरोनाची लस Ad26 प्राण्यांवर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले आहे.
NVX‑CoV2373 लसीची चाचणी १३० निरोगी लोकांवरही करण्यात आली होती. १८ ते ५९ वर्ष वयोगटातील लोकांचा या चाचणीत समावेश होता. ८३ स्वयंसेवकांना बुस्टर डोस तर २५ स्वयंसेवकांना नॉर्मल डोस देण्यात आले होते. 'द न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार तज्ज्ञांनी ३५ साव्या दिवशी या माहितीचे विश्लेषण केले होते. अनेक स्वयंसेवकांवर लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. एका स्वयंसेवकाला डोस दिल्यानंतर तीन दिवसांपर्यंत ताप आला होता. खूप कमी लोकांमध्ये या लसीचे नकारात्मक परिणाम दिसून आले.
या अभ्यासानुसार ज्या लोकांना बुस्टर डोस देण्यात आले होते. अशा स्वयंसेवकांमध्ये कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांच्या तुलनेत ४ ते ६ टक्क्यांनी अधिक एँटीबॉडी दिसून आल्या. बुस्टर डोसमुळे CD4+ T सेल्समध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला. T सेल्स रोगप्रतिकारकशक्तीला व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असतात. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही लस लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये २ डिग्री ते ८डिग्री तापमानात ठेवली जाऊ शकते.
Johnson & Johnson कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही लस उंदरांमध्ये चाचणीदरम्यान सुरक्षित ठरली असून गंभीर संक्रमणापासून बचाव करत आहे. ज्या उंदरांना लस देण्यात आली होती त्या उंदरांच्या शरीरात एँटीबॉडीजची वाढ झालेली दिसून आली. J&J चे साइंटिफिक ऑफिसर पॉल स्टॉफेल्स यांनी सांगितले की शेवटच्या ट्प्प्यातील परिक्षण या महिन्यात सुरू होईल. ज्या उंदरांना ही लस देण्यात आली त्या उंदरांमध्ये कोणतेही गंभीर आजार पसरलेले नव्हते. गुरुवारी नेचर जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता.
कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना स्टरॉईड दिलं जाऊ शकतं. जून महिन्यात ऑक्सफओर्ड युनिव्हर्सिटीकडून रिकव्हरी ट्रायल सुरू करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की, दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे. या चाचण्याव्यतिरिक्त इतर अनेक परिणाम समोर आले आहे. त्यातून हायड्रोरकार्टसोन नावाचे स्टेरॉईड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.
हाइड्रोकार्टिसोन स्वस्त असल्यामुळे सहज उपलब्ध होऊ शकतं. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये ७ चाचण्याचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत. या नुसार या दोन स्टेरॉइडने कोरोनामुळे गंभीर स्थिीत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. या संशोधनाचे लेखक आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जोनाथन स्टर्न यांनी सांगितले की, स्टेरॉईड एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं औषधं आहे. हे औषधं कोणत्याही वयोगटातील कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्यापासून वाचवण्यासाठी परिणामकारक ठरत आहे.
रिकव्हरी ट्रायल ब्राजील, फ्रांससह इतर अनेक देशांमध्ये करण्यात आलं होतं. हाइड्रोकार्टिसोन आणि डेक्सामेथासोन स्टेरॉईड ही औषध गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरत आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि रिकव्हरी ट्रायलचे डेप्यूटी चीफ मार्टिन लँडरे यांच्यामते जेव्हा रुग्णांला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तेव्हा व्हेंटिलेटरची वाट न पाहता स्टेरॉईड द्यायला हवं.
हे पण वाचा-
काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा
'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र
coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती