आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 11:12 AM2018-12-26T11:12:45+5:302018-12-26T11:18:40+5:30
लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली.
जर्मनीच्या एका फॅक्टरीमध्ये काही वर्षांपूर्वी एक संशोधकांनी एक रिअल-वर्ल्ड रिसर्च केला. ज्यात त्यांनी लवकर उठणे पसंत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाच्या शिफ्टमध्ये काम दिलं तर उशीराने उठणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम दिलं. लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली. म्हणजे लोकांच्या इंटरनल क्लॉकच्या हिशोबाने जेव्हा त्यांचं कामाचं वेळापत्रक ठरवलं तेव्हा या कर्मचाऱ्यांना वर्किंड डे मध्ये १६ टक्के अतिरिक्त झोप घेण्यास मदत मिळाली. सोबतच त्यांना जास्त आणि चांगला आराम करायला मिळाला.
झोप न झाल्याने अनेक आजारांचा धोका
इमरजिंग सायन्सनुसार या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची आणि उठण्याची एक आपली वेगळी वेळ असते. हा एक पर्सनलाइज्ड बायोलॉजिकल रिदम आहे. याला क्रोनोटाइप म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या शरीराला झोपायचं असतं तेव्हा जर तुम्ही झोपू शकत असाल आणि नंतर तुम्हाला झोपायचं असतं, तेव्हा तुम्हाला झोप येणार नाही. याचा परिणाम तुम्हाला थकवा जाणवेल, तुमचं कामात लक्ष लागणार नाही, चुका होतील, सोबत आरोग्याशी संबंधित समस्याही होती. याने हृदयरोग, डिप्रेशन अशाही समस्यांचा धोका वाढतो.
बॉडी क्लॉकसोबत जुळत नाही ८० टक्के लोकांचं वर्क शेड्यूल
यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडोचे सहायक प्राध्यापक सिलेन वेटर म्हणाले की, जगभरात साधारण ८० टक्के लोक असे आहेत ज्यांचं वर्क शेड्यूल म्हणजे कामाचे तास त्यांच्या अंतर्गत घडाळ्याशी जुळत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा क्रोनोटाइप आणि कामाचे तास पाहिले जर दोन्हींमध्ये विरोधाभास बघायला मिळेल. मोबाइल फोनचे कॉल सेंटर, पॅकेजिंग-मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑइल ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात एका अभ्यासानुसार, या कंपन्यांचे कर्माचारी जास्त स्ट्रेसमध्ये राहतात आणि त्यांना कामाशी संबंधित त्रास जास्त होतो. त्यासोबतच २०१५ मध्ये हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासातही ही बाब समोर आली आहे की, ज्या लोकांना रात्री जागणे आणि दिवसा झोपणे पसंत आहे, अशांना जर दिवसा काम करावं लागलं तर त्यांना डायबिटीजचा धोका अनेक पटीने वाढतो.
शरीरानुसार शिफ्ट निवडण्याचं स्वातंत्र्य
काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बॉटी क्लॉकच्या हिशोबाने शिफ्ट देणे सुरु केले आहे. साउथवेस्ट एअरलाइन्सने त्यांच्या पायलटना अशाप्रकारची सूट दिली आहे. यूएस नेव्हीने सुद्धा १८ तासांची सबमरीन शिफ्ट शेड्यूल २४ तासांची केली. ही शिफ्ट सेलर्सच्या बायोलॉजिकल रिदमसोबत जास्त जुळते. सोबतच काही फार्मास्यूटिकल, सॉफ्टवेअर आणि फायनॅन्शिअल कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवसा केवळ काही तासच ऑफिसमध्ये येण्यास सांगतात.
रात्री उशीरा झोपतात ५६ टक्के लोक
क्रोनोटाइपबाबत बोलायचं तर जगभरातील साधारण १३ टक्के लोक रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत झोपतात. साधारण ३१ टक्के लोक थोडं आणखी लवकर झोपतात. तर साधारण ५६ टक्के लोक असे आहेत जे आणखी उशीरा झोपतात. याचा अर्थ साधारण ६९ टक्के लोक असे आहेत, त्यांना सकाळी ८ किंवा ९ वाजता ऑफिसला जाण्यासाठी त्यांच्या शरीराची तयारी नसतानाही उठावं लागतं.