एरंडोल तालुक्यात पोषण आहारावर महिन्याला १८ लाख रू. खर्च

By admin | Published: September 11, 2015 09:25 PM2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T21:25:00+5:30

ऑगस्ट महिन्यात कुपोषित बालकांची संख्या २७५

Nutrition in Erandol taluka is Rs 18 lakh per month for diet. Expenditure | एरंडोल तालुक्यात पोषण आहारावर महिन्याला १८ लाख रू. खर्च

एरंडोल तालुक्यात पोषण आहारावर महिन्याला १८ लाख रू. खर्च

Next
स्ट महिन्यात कुपोषित बालकांची संख्या २७५
एरंडोल : तालुक्यात अंगणवाड्यांमधील बालके, गरोदर माता व स्तनदा माता यांच्या पोषण आहारावर दर महिन्याला जवळपास १८ लाख रू. खर्च होतात. पाण्यासारखा पैसा खर्च होऊन देखील ऑगस्ट २०१५ या महिन्यात अति तिव्र कुपोषित बालकांची संख्या २७५ आहे. या मागची कारणे शेधण्याची गरज आहे. एरंडोल तालुका नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा कुपोषिण मुक्त कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
एरंडोल तालुक्यात नियमित अंगणवाड्या १५४ व १२ मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना नाश्ता व आहार दिला जातो. तसेच बुधवारी व शुक्रवारी केळी किंवा अंडी दिली जातो. तिखट अथवा गोड लापसीचा नाश्ता मिळतो. कधी कधी कडधान्याची उसळ मिळते. प्रति दिन बालकांवर २९ हजार ५२० रू. पोषण आहारासाठी खर्च होतो. एका महिन्याला ८ लाख ८५ हजार ६०० रू. खर्च होतो.
गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालके यांच्यासाठी महिन्यातून ९ दिवस उपमा, शिरा, सुकडी पुरविण्यात येते. त्यावर महिन्याला १० लाख रू. खर्ची पडतात. गेल्या महिन्यात गरोदर मातांची संख्या ११४८ व स्तनदा माता ११६९ होत्या. शून्य ते सहा वयोगटातील बालके १२ हजार ७४७ आहेत. त्यात बालके ६३८७ व बालिका ६३६० आहेत.
पोषण आहारामुळे कुपोषण बाहेर काढण्यात मदत होते. तसेच सूदृढ बालक होण्यासाठी हातभार लागतो. मात्र प्रत्यक्षात ऑगस्ट २०१५ मध्ये अति तिव्र बालके २७५ व मध्यम १००३ बालके आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत कानोसा घेतला असता ग्रामीण भागात शेतमजूर, आर्थिकदृष्टया कमकुवत पालकाच्या बालकांना दिवसातून किमान ४ वेळा आहार मिळणे शक्य होत नाही. तसेच योग्य वेळी .... व आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते. पण पालकांच्या उदासिनतेमुळे त्या बाबिंकडे दुर्लक्ष केले जाते. याशिवाय घरात स्वच्छतेचा अभाव असतो. व शारिरीक स्वच्छता राखली जात नाही. हा वस्तुस्थिती आहे. परिणामी कुपोषण निर्मूलन होण्यात अडथळे निर्माण होतात. केवळ शासनाच्या भरवशावर व बालविकास योजनेच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन शक्य नाही. पालकांची जागरूकता व मानसिकता तेवढीच गरजेची आहे.
जोड......

Web Title: Nutrition in Erandol taluka is Rs 18 lakh per month for diet. Expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.