मीठ अशाप्रकारे खाऊन करा एक्सरसाइज, कळणारही नाही कुठे गेली शरीरातील चरबी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:49 PM2022-06-30T17:49:47+5:302022-06-30T17:51:32+5:30
Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये हेही महत्वाचं आहे की, एक्सरसाइज करण्याआधी आणि नंतर काय खाल्लं जावं. काही असे पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्याने एक्सरसाइज करण्यास मदत मिळते.
Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करणं एक कठिण काम आहे. ज्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि आहार दोन्हींवर लक्ष द्यावं लागतं. बरेच लोक आहेत जे वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. एक्सपर्ट सांगतात की, नेहमी हेल्दी पद्धतीने वजन कमी केलं पाहिजे. एक्स्ट्रा फॅट बर्न करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करा आणि ही प्रक्रिया वेगाने होईल अशा पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये हेही महत्वाचं आहे की, एक्सरसाइज करण्याआधी आणि नंतर काय खाल्लं जावं. काही असे पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्याने एक्सरसाइज करण्यास मदत मिळते.
न्यूट्रिशनिस्ट निधी निगम यांच्यानुसार, तुम्ही ऐकलं असेल की, रनिंग किंवा जिमला जाण्याआधी काही प्रोटीन असलेला पदार्थ जसे की, केळी, नट्स, पनीर खाल्ल्याने जास्त फायदा मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, वर्कआउट करण्याआधी मिठासारखा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला एक्सरसाइज करणे आणि हेल्दी पद्धतीने पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यास मदत मिळते. एक्सरसाइज करण्याआधी एक चिमुट मीठ खाल्ल्याने तुमच्या वर्कआउटमध्ये एनर्जी येते. चला जाणून घेऊ याचे फायदे...
हायड्रेशन सुधारतं
मीठ शरीरात पाणी कायम राखण्यास मदत करतं. हेच कारण आहे की, एक्सरसाइजआधी एक चिमुट मीठ खाल्ल्याने तुम्हाला वर्कआउट करताना डिहायड्रेशनची समस्या होत नाही.
हृदयाची गति कमी करतं
मीठ हे शरीरात ब्लड फ्लो सुधारण्यासाठीही ओळखलं जातं. अर्थातच एक्सरसाइज करताना ब्लड फ्लो योग्य राहणं गरजेचं असतं. मीठ वर्कआउट दरम्यान ब्लड फ्लो कमी ठेवतं.
मांसेपशींची समस्या दूर ठेवतं
मिठाचं सेवन केल्याने ब्लड फ्लो सुधारतो आणि हेच कारण आहे की, वर्कआउट दरम्यान आणि नंतर मांसपेशींची समस्या, जॉइंटमध्ये वेदना होण्याचा धोका टळतो.
पावर आउटपूट वाढतं
मिठाने शरीरात ऊर्जा वाढते. पावर पॅक वर्कआउटनंतर ऊर्जेची गरज असते. मीठ वर्कआउट करताना खर्ची झालेले इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्याची बेस्ट पद्धत मानली जाते.
बॉडी टेम्प्रेचर कमी
एक्सरसाइज दरम्यान बॉडी टेम्प्रेचर वाढणं सामान्य बाब आहे. मीठ याला कमी करतं. याने हृदयाची गतीही कमी केली जाते. सोबतच याने सहनशक्तीही वाढते आणि कार्डिएक आउटपुट वाढतं.