चपाती आणि भात एकत्र खावा की नाही? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:59 PM2024-06-06T16:59:53+5:302024-06-06T17:03:12+5:30
अनेकांना असा प्रश्न पडतो की, भात आणि चपाती एकत्र खाणं योग्य आहे की अयोग्य?
चपाती आणि भात भारतीय लोकांच्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग आहेत.आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भात आणि चपाती किती महत्वाच्या आहेत हेही तुम्हाला माहीत आहे. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, भात आणि चपाती एकत्र खाणं योग्य आहे की अयोग्य? तर डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, भात आणि चपाती एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
भात-चपाती एकत्र खावी की नाही?
एक्सपर्ट्सनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये. कारण याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी इनटेक करत असता आणि जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्यावर पचन तंत्रांवर अधिक दबाव पडतो.
भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. काही रिसर्चमधूनही समोर आली आहे की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.
रात्रीच्या जेवणात काय असावं?
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, रात्रीच्या जेवणात काय खावं? याचं उत्तर सोपं आहे. रात्री जेवण हे नेहमी पचायला हलकं असंच करावं.
डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.
रात्री भात का खाऊ नये?
भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. अनेकांना भाताची अॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.