हिवाळ्यात वेगाने वाढतं ब्लड प्रेशर, या 5 फूडने लगेच कंट्रोल करा 'साइलेंट किलर'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:06 AM2023-01-13T11:06:51+5:302023-01-13T11:27:18+5:30

High Blood Pressure : न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्राने काही पोटॅशिअम युक्त फूडची लिस्ट शेअर केली, ज्यांच्या सेवनाने हाय बीपीची समस्या घरीच कंट्रोल केली जाऊ शकते.

Nutritionist Lovneet Batra shared 5 potassium rich foods to reduce high blood pressure | हिवाळ्यात वेगाने वाढतं ब्लड प्रेशर, या 5 फूडने लगेच कंट्रोल करा 'साइलेंट किलर'

हिवाळ्यात वेगाने वाढतं ब्लड प्रेशर, या 5 फूडने लगेच कंट्रोल करा 'साइलेंट किलर'

googlenewsNext

हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) ही एक सामान्य समस्या आहे. जी पुढे जाऊन  हार्ट फेलचं कारण ठरू शकते. या आजाराला सायलेंट किलरही म्हटलं जातं. कारण हा आजार झाल्यावर याचे काहीच संकेत दिसत नाहीत. मायो क्लीनिकनुसार, हा आजार थंडीमुळे रक्तनलिका आकुंचन पावल्याने आणखी गंभीर होते.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्राने काही पोटॅशिअम युक्त फूडची लिस्ट शेअर केली, ज्यांच्या सेवनाने हाय बीपीची समस्या घरीच कंट्रोल केली जाऊ शकते. त्यांनी सांगितलं की हार्ट डिजीजचा धोका वाढणाऱ्या हाय ब्लड प्रेशरला आहाराने आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करून ठीक केलं जाऊ शकतं.

राजगीऱ्याचं पीठ

रोज राजगीऱ्यासारखं कडधान्य खाल्ल्याने ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. राजगीऱ्याच्या पीठामध्ये प्रोटीन, पोटॅशियम, फायबर सारखे फायदेशीर तत्व असतात. त्याशिवाय यात पेप्टाइड्सही असतं. ज्यात अॅंटीहाइपरटेन्सिव गुण असतात.

मटकीची डाळ

मटकीची आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहीत आहेच. तशीच मटकीची डाळही फायदेशीर ठरते. या डाळीमध्ये फोलिक अॅसिड, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, प्रोटीन भरपूर असतं. शरीरात ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करणारे एंजाइम रोखण्याचं काम यांनी केलं जातं. अशात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी मटकीची डाळ नियमित खावी.

केळी

पोटॅशिअम सोडिअमच्या प्रभावाला कमी करतो आणि रक्तनलिकेतील तणावही केला जातो. अशात हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी केळींचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण यात भरपूर पोटॅशिअम असतं.

नारळाचं पाणी

नारळाच्या पाण्यातही भरपूर पोटॅशिअम असतं. जे हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर ठरतं. पण जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरची औषधं घेत असाल तर याचं सेवन करणं टाळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Nutritionist Lovneet Batra shared 5 potassium rich foods to reduce high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.