Lotus stem : कमळ काकडीचे आरोग्याला होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, खाताच हे 4 आजार मुळापासून होतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:57 PM2022-06-28T13:57:41+5:302022-06-28T13:57:55+5:30

Lotus stem benefits : कमळ काकडी एनीमियापासून ते ब्लड प्रेशर संबंधित आजारांना दूर करण्यातही फायदेशीर ठरते. तुम्ही कमळ काकडी वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकता. जसे की, चिप्स, सूप किंवा चहा.

Nutritionist Lovneet Batra shares benefits of lotus stem it helps to improves overall health | Lotus stem : कमळ काकडीचे आरोग्याला होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, खाताच हे 4 आजार मुळापासून होतात दूर

Lotus stem : कमळ काकडीचे आरोग्याला होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, खाताच हे 4 आजार मुळापासून होतात दूर

googlenewsNext

कमळ काकडी(Lotus Root) कमळाच्या मुळांना म्हटलं जातं. याला 'द सीक्रेट लोटस' नावानेही ओळखलं जातं. जास्तीत जास्त लोकांना याच्या सेवनाची पद्धत आणि याचे फायदे माहीत नाहीत. मात्र, राष्ट्रीय फूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमळाचे मूळ फारच फायदेशीर आहेत. प्राचीन काळापासून याचा वापर औषधी म्हणून केला जात आहे. कमळ काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. त्यासोबतच यात व्हिटॅमिन्स आणि खनिजही भरपूर असतात.

कमळ काकडी एनीमियापासून ते ब्लड प्रेशर संबंधित आजारांना दूर करण्यातही फायदेशीर ठरते. तुम्ही कमळ काकडी वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकता. जसे की, चिप्स, सूप किंवा चहा.

कमळ काकडीच्या औषधी गुणांबाबत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, कमळाची मूळं ज्याला कमळ काकडी म्हणतात एक बहुमुखी भाजी आहे. टेस्टसोबतच यातून अनेक पोषक तत्व मिळतात, जे आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत.

कोणते आहेत पोषक तत्व?

कमळ काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजं आहेत. सोबतच यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, तांबे, लोह, मॅगनीज तसेच थियामिन, पॅटोफेनीक अॅसिड, जस्ता, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी हेही आढळतं. इतकंच नाही तर कमळ काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात.

पचनास फायदेशीर

कमळ काकडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पचनक्रियेसंबंधी समस्या सहजपणे दूर होतात. जसे की, बद्धकोष्टता, पचनास समस्या असेल तर याने लगेच दूर होतात. 

एनीमियाचा धोका कमी राहतो 

कमळ काकडीमध्ये लोह आणि तांबे हे महत्वपूर्ण तत्व असतात. हे तत्व लाल रक्त पेशींच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावतात. याने एनीमियाचा धोकाही कमी होतो. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही याने मदत मिळते. सोबतच याने शरीरात ऑक्सीजनही वाढतं.

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी

कमळ काकडीमध्ये आढळणारं पोटॅशिअम शरीरातील तरल पदार्थांमध्ये एक संतुलन ठेवण्यास मदत करतं. पोटॅशिअम एक वासोडिलेटर आहे, म्हणजे याने रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि त्या कठोर होत नाहीत. याने रक्तप्रवाह वाढतो. तसेच हृदयावरील तणावही याने कमी होतो.

मूड चांगला करण्याचं काम

व्हिटॅमिन बी चे तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे थेट मेंदूतील तंत्रिका रिसेप्टर्ससोबत संपर्क करतात जे मूड आणि मानसिक स्थितीला प्रभावित करण्याचं काम करतात. याने चिडचिडपणा, डोकेदुखी आणि तणाव नियंत्रणात राहतो.

Web Title: Nutritionist Lovneet Batra shares benefits of lotus stem it helps to improves overall health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.