हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे बॅड कोलेस्ट्रॉल, तज्ज्ञांनी सांगितलं ते बाहेर काढण्यासाठी काय खावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:16 PM2022-06-28T15:16:15+5:302022-06-28T15:17:40+5:30
Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉल खाद्य पदार्थांमध्ये त्या गोष्टी असतात ज्यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असतं. हेच कारण आहे की, एक्सपर्ट मांस, फॅट असलेले डेअरी पदार्थ आणि तेलातील पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. कारण यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं.
Cholesterol : कोलेस्ट्रॉल एक असा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. हा दोन प्रकारचा असतो. एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा गुड कोलेस्ट्रॉल. शरीरात कोलेस्ट्रॉल तुम्ही खाल्लेल्या पदार्थांपासून तयार होतं. तसेच तुमचं लिव्हरही कोलेस्ट्रॉल तयार करतं. क्लीवलॅंड क्लीनिकचं मत आहे की, तुमचं लिव्हर कोलेस्ट्रॉलचं मोठं कारण आहे. जे तुमच्या रक्तात कोलेस्ट्रॉल जवळपास 85 टक्के तयार करतं. हाय कोलेस्ट्रॉल खाद्य पदार्थांमध्ये त्या गोष्टी असतात ज्यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असतं. हेच कारण आहे की, एक्सपर्ट मांस, फॅट असलेले डेअरी पदार्थ आणि तेलातील पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. कारण यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं.
कोलेस्ट्रॉल कमी कसं करावं?
कोलेस्ट्रॉल वाढणं हृदयासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. याने तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी किंवा याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि हेल्दी डाएटवर लक्ष द्यावं लागेल. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.
लसूण
रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही लसणाचं सेवन करण्याच्या सल्ला त्यांनी दिला आहे. रोज लसणाची एक किंवा अर्धी कच्ची कळी खाल्ली तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जवळपास 10 टक्के कमी होतं.
धने
धन्यांमध्ये अॅंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच या बियांमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनसारखे अनेक प्रमुख व्हिटॅमिन्स आहेत. एक चमचा धने पाण्यात साधारण 2 मिनिटे उकडून घ्या आणि नंतर ते पाणी गाळा. हे पाणी प्या.
मेथीच्या बिया
मेथीच्या बियांचं नियमितपणे सेवन केलं तर खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. याचं कारण मेथीच्या बियांमध्ये स्टेरायडल सॅपोनिन असतात, जे आतड्यांतील कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करतं.
कडधान्य
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही कडधान्यांचं सेवन केलं पाहिजे. इतकंच नाही तर कडधान्याचं सेवन केल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यास आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. या धान्यांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्याने हाय कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या
शतावरी, ब्रसेल्स स्प्राउट्स, फ्लॉवर, ब्रोकोली, पत्ताकोबी, टोमॅटो, मिरची, ओवा, गाजर आणि कांद्यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्यांमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर व प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. यांच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.