Cholesterol Home Remedy: हळद आणि काळ्या मिऱ्यांचा हा उपाय शरीरातून दूर करेल कोलेस्ट्रॉल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 10:24 AM2023-05-09T10:24:13+5:302023-05-09T10:26:33+5:30

How To Reduce Cholesterol : भरपूर फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा मेणासारखा हा चिकट पदार्थ नसांना ब्लॉक करतो. ज्यामुळे रक्तप्रवाह हळूवार होतो. 

Nutritionist shares easy and effective remedy for bad cholesterol claim turmeric and black pepper can reduce ldl | Cholesterol Home Remedy: हळद आणि काळ्या मिऱ्यांचा हा उपाय शरीरातून दूर करेल कोलेस्ट्रॉल!

Cholesterol Home Remedy: हळद आणि काळ्या मिऱ्यांचा हा उपाय शरीरातून दूर करेल कोलेस्ट्रॉल!

googlenewsNext

How To Reduce Cholesterol Without Medicine: कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक गंभीर समस्या ठरू शकते. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलं तर हा याचा संकेत आहे की, तुम्हाला कधीही हृदयरोग, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या स्थितींचा सामना करावा लागू शकतो. 

भरपूर फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा मेणासारखा हा चिकट पदार्थ नसांना ब्लॉक करतो. ज्यामुळे रक्तप्रवाह हळूवार होतो. 

काय करावा उपाय?

न्यूट्रिशनिस्ट आणि डाइटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फॅट असलेले पदार्थ टाळले पाहिजे आणि नियमितपणे एक्सरसाइज केली पाहिजे. काही घरगुती उपायांनी सुद्धा याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. यातीलच एक उपाय म्हणजे हळद आणि काळे मीरे....

हाय कोलेस्ट्रॉल कमी करते हळद

हळदकडे इम्यूनिटी बूस्टरच्या रूपात पाहिलं जातं. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी इंफ्लेमेटरी गुण असल्याने हा मसाला हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो. यात कर्क्यूमिन नावाचं एक तत्व असतं, जे फार फायदेशीर असतं. करक्यूमिन फ्री रॅडिकल्स सेल्सना नष्ट करतं. तसेच हळदीने ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी होतो, ज्याने जुन्या आजारांचा धोका वाढतो. कर्क्यूमिन तुमच्या ब्लड वेसेल्सच्या लायनिंगचं काम सुधारून हृदयरोगांचा धोका कमी करतं. तसेच याने ब्लड प्रेशरही कंट्रोल राहतं. 

वैज्ञानिकांनाही मान्य आहे हळदीची ताकद

NCBI वर प्रकाशित एका रिसर्चमधून समोर आलं की, करक्यूमिन सुरक्षित आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगांचा धोकाही याने कमी केला जाऊ शकतो. एका अभ्यासानुसार, हळदीचा अर्क कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करणे आणि बॅड कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखतो.

हळदीची शक्ती वाढवण्याची पद्धत

हळदीची शक्ती वाढवण्यासाठी यातील करक्यूमिनचं अवशोषण आणि त्याची पॉवर वाढवण्यासाठी हळदीसोबत काळ्या मिऱ्यांचं सेवन केलं पाहिजे. हळदीसोबत काळ्या मिऱ्यांचं सेवन केलं तर याची पॉवर वाढते. 

कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात हळद पावडर आणि काळ्या मिऱ्याचं पावडर टाकून पाणी उकडून सेवन करावं. दुसरी पद्धत ही आहे की, कच्ची हळद काऱ्या मिऱ्यांसोबत पाण्यात उकडून सेवन करू शकता.
 

Web Title: Nutritionist shares easy and effective remedy for bad cholesterol claim turmeric and black pepper can reduce ldl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.