मध, काही बियांचं सेवन करून थांबवा केसगळती; अनेक उपाय केले असतील हाही करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:24 PM2024-06-19T16:24:18+5:302024-06-19T16:24:46+5:30

Hair Fall: लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांची समस्या दूर होतेच असं नाही.

Nutritionist suggest to eat these seeds with honey to reduce hair fall | मध, काही बियांचं सेवन करून थांबवा केसगळती; अनेक उपाय केले असतील हाही करून बघा!

मध, काही बियांचं सेवन करून थांबवा केसगळती; अनेक उपाय केले असतील हाही करून बघा!

Hair Fall: केसगळतीची समस्या आजकाल अनेकांना भेडसावत आहे. महिला असो वा पुरूष, जास्त वय असो वा कमी सगळेच केसगळतीमुळे हैराण आहेत. कमी वयातच अनेकांना टक्कल पडत आहे. पण लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांची समस्या दूर होतेच असं नाही. अशात आज आम्ही केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगणार आहोत.

न्यूट्रिशनिस्ट किरन कुकरेजा यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून यावर एक उपाय सांगितला आहे. त्यांच्यानुसार, जर तुम्ही मधात टाकून काही बियांचं सेवन कराल तर केसगळतीची समस्या दूर होऊ शकते.

एक्सपर्टनुसार, मधात भोपळ्याच्या बीया, काळे तीळ आणि सूर्यफुलाच्या बीया टाकून सेवन केलं तर शरीराला केसांसाठी आवश्यक झिंक, मॅग्नेशिअम, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर मिळतात. ज्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळतं.

अशात एक चमचा मधात जर या थोड्या थोड्या बीया टाकून खाल तर केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. ही समस्या दूर करण्यासाठी मध आणि या बियांचं सेवन तुम्हाला रिकाम्या पोटी करायचं आहे.

केसगळती दूर करणारे इतर उपाय

- वेगवेगळ्या बेरीज जसे की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीजमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारं केसांचं नुकसान रोखण्यास मदत करतात. याने केसगळतीची समस्या दूर होते.

- पालक केसगळतीची समस्या रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पालकाच्या सेवनाने शरीराला फोलेट, आयर्न आणि व्हिटॅमिन ए सोबतच व्हिटॅमिन सी सुद्धा मिळतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

- पालकासोबतच केसांसाठी रताळेही खूप फायदेशीर ठरतात. यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर असतात ज्यामुळे केस मजबूत होतात.

- व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असलेल्या एवाकाडोमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस मजबूत होतात.

Web Title: Nutritionist suggest to eat these seeds with honey to reduce hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.