न्यूट्रिशनिस्टनुसार व्हिटॅमिन्स कमी झाल्यास शरीरावर दिसतात 'हे' संकेत, सोबतच सांगितले उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:55 AM2024-08-31T10:55:49+5:302024-08-31T10:58:29+5:30

Vitamin deficiency symptoms : न्यूट्रिशनिस्ट सपना गर्ग यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी शरीरात व्हिटॅमिन्स कमी झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात याबाबत माहिती दिली आहे.

Nutritionist tells about vitamin deficiency symptoms and how to gain its | न्यूट्रिशनिस्टनुसार व्हिटॅमिन्स कमी झाल्यास शरीरावर दिसतात 'हे' संकेत, सोबतच सांगितले उपाय...

न्यूट्रिशनिस्टनुसार व्हिटॅमिन्स कमी झाल्यास शरीरावर दिसतात 'हे' संकेत, सोबतच सांगितले उपाय...

Vitamin deficiency symptoms : शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी व्हिटॅमिन फार महत्वाचे असतात. अशात जर शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता झाली तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, शरीरात व्हिटॅमिन्स कमी झालेत कसं ओळखावं हे अनेकांना माहीत नसतं. अशात न्यूट्रिशनिस्ट सपना गर्ग यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी शरीरात व्हिटॅमिन्स कमी झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी व्हिटॅमिन्स कसे मिळवाल हेही सांगितलं आहे.

व्हिटॅमिन्स कमी झाल्याची लक्षणं आणि उपाय

- तुमच्या शरीरात नेहमीच वेदना होत असेल तर शरीरात पोटॅशिअम कमी झाल्याचा संकेत आहे.

- तुमची त्वचा रखरखीत आणि निर्जीव दिसत असेल तर तुमच्या शरीरात झिंक कमी झाल्याचा संकेत आहे. 

- त्याशिवाय बेली फॅट वाढत असेल म्हणजे पोट बाहेर येत असले तर याचा अर्थ तुमच्या शरीरात एस्ट्रोजन वाढलं आहे.

- मसल्समध्ये क्रॅम्प येत असेल तर तुमच्यात मॅग्नेशिअम कमी झालं आहे.

- जर तुम्हाला बर्फ खाण्याची ईच्छा होत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता झाली असं समजा.

- तुमचे पाय आणि हातांमध्ये झिणझिण्या येत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी झालं आहे.

व्हिटॅमिन्स कसे मिळवाल?

- शरीरातील पोटॅशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी केळी, रताळे, बीट, पालक, एवाकोडा, नारळ पाणी यांचं सेवन करा.

- झिंक मिळवण्यासाठी ओट्स, भोपळ्याच्या बीया, चणे, काजूचं सेवन करा.

- शरीरात वाढलेलं एस्ट्रोजन कमी करण्यासाठी क्रूसिफेरस भाज्या आणि गाजराचं सेवन करा.

- मॅग्नेशिअम मिळवण्यासाठी पालक, काजू, कोको, एवोकाडो, भोपळ्याच्या बियांचं सेवन करा.

- आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, काळे मनुके, आलु बुखारा, वेगवेगळ्या डाळींचं सेवन करा.

- व्हिटॅमिन बी १२ मिळवण्यासाठी अंडी, पालक, पनीर आणि दुधाचं सेवन करा.
 

Web Title: Nutritionist tells about vitamin deficiency symptoms and how to gain its

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.