दोन आठवडे रोज नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:11 AM2024-09-03T11:11:55+5:302024-09-03T11:12:30+5:30
Healthy Drinks: शरीर हायड्रेट राहिलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह कमी करण्यास मदत मिळते.
Healthy Drinks: आरोग्य चांगलं ठेवण्याचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक पौष्टिक आहार घेण्यावर भर देतात. आहारात पालेभाज्या, फळं आणि कडधान्यांचा समावेश केला जातो. तसेच काही हेल्दी ड्रिंक्सही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या ड्रिंक्सने शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळतं. शरीर हायड्रेट राहिलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत मिळते.
न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशाच काही हेल्दी ड्रिंक्सबाबत माहिती दिली आहे. ज्यांचं रोज सेवन केल्याने आरोग्यावर कमालीचे फायदे दिसू लागतात. या ड्रिंक्समध्ये नारळ पाणी, लिंबू पाणी आणि आल्याच्या रसाचा समावेश आहे. हे ड्रिंक्स रोज प्यायल्याने शरीराला काय फायदे मिळतात हेच आज आपण बघणार आहोत.
रोज हेल्दी ड्रिंक्स पिण्याचे फायदे
न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, जर तुम्ही रोज दोन आठवडे नारळ प्याल तर याने बेली फॅट बर्न होईल आणि ब्लोटिंगची समस्या दूर होईल. जर तुम्ही रोज 2 आठवडे लिंबू पाणी प्याल याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल आणि सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासही मदत मिळेल.
रोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा रस सेवन कराल तर याने त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल आणि सोबतच चेहऱ्यावर पुरळ किंवा सुरकुत्या दिसणार नाहीत.
ऑईल पुलिंगचे फायदे
दातांवर ऑईल पुलिंग केल्यानेही अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, रोज ऑईल पुलिंग केल्याने इम्यूनिट वाढते, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि तुम्हाला आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक वाटत. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि दातांना किडही लागत नाही.
ऑईल पुलिंग करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. तोंडात 1 ते 2 चमचे खोबऱ्याचं तेल ठेवून ते तोंडात फिरवा. 2 ते 3 मिनिटे ऑईल पुलिंग केल्याने दातांची चांगली स्वच्छता होते. ऑईल पुलिंगमुळे दातांच्या अनेक समस्या दूर होतात.