न्यूट्रिशनिस्टने सांगितलं एका दिवसात किती खजूर खावे, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:54 AM2024-09-28T11:54:04+5:302024-09-28T11:54:25+5:30
Dates Benefits : खजूर खाण्याच्या फायद्यांबाबत न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा सिंह यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Dates Benefits : ड्राय फ्रूट्स हे सुपरफूड मानले जातात. कारण यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर असतात. ड्राय फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातीलच एक म्हणजे खजूर. खजूर खाण्याच्या फायद्यांबाबत न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा सिंह यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी दिवसभरात किती खजूर खावे आणि त्यांचे फायदे होतील हे सांगितलं आहे.
रोज खजूर खाण्याचे फायदे
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, जर तुम्ही रोज खजूर खाल तर याने तुमच्या ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलवर चांगला प्रभाव पडेल. खजुरामुळे ब्लड शुगर कमीही होऊ शकते. कारण याचा जीआय इंडेक्य कमी असतो आणि यामुळे तुमची ब्लड शुगर वाढत नाही.
खजूर खाल्ल्याने तुमचं लिपिड प्रोफाइलचं चांगलं होतं. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. कारण यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात.
रोज स्नॅक्ससारखे खजूर खाल्ले तर याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात फायबर भरपूर असतं आणि याचा शुगरवर कमी प्रभाव पडतो. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा होत नाही.
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, तुम्ही साधारपणे एक दिवसात २ ते ३ खजूर खाऊ शकता. तसेच याने शरीराला काय फायदे मिळतील हे जाणून घेऊ.
हे होतात फायदे
- खजूर खाल्ल्याने गट हेल्थ चांगली राहते.
- हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खजुराचं नियमित सेवन करावं.
- खजूर खाल्ल्याने मेंदुचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.
- यातून शरीराला भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे शरीराचं नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात.
- खजुराने त्वचेलाही फायदे मिळतात आणि त्वचा उजळण्यास मदत मिळते.