कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी 'या' बियांचं करा सेवन, जाणून घ्या पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:41 AM2024-09-02T11:41:56+5:302024-09-02T11:42:25+5:30
Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. मात्र, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत.
Cholesterol : आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल हे शरीरात आढळणारं एकप्रकारचं फॅट असतं. काही प्रमाणात हे शरीरासाठी महत्वाचं असतं, पण याचं प्रमाण वाढलं तर स्थिती गंभीर होऊ शकते.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही. अशात तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर शरीरात वेगवेगळे संकेत दिसू लागतात.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. मात्र, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे म्हणजे मेथीच्या बीया. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी मेथीच्या बियांच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं याबाबत सांगितलं आहे. अशात आधी मेथीच्या बियांचे काही फायदे जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉल कमी करतात मेथीच्या बीया
एक्सपर्टनुसार, मेथीच्या बीया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहेत. यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. तसेच मेथीच्या बियांमुळे ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. मेथीच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात.
ब्लड शुगर लेव्हल होते कंट्रोल
पहिला फायदा हा आहे की, भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचं सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर असतं, जे कार्बोहायड्रेटचं अवशोषण हळुवार करून ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतं. इतकंच नाही तर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरातील कॅलरी वेगाने बर्न होतात. याचा फायदा असा की, तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
पचन तंत्र मजबूत राहतं
भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत होतं. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच मेथीच्या दाण्यांमुळे शरीरातील सूजही कमी होते.
फुप्फुसाची समस्या होते दूर
त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.
मेथीच्या दाण्यांचं कसं कराल सेवन?
- रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन करा.
- मेथीच्या दाण्यांचा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये समावेश करू शकता. वेगवेगळ्या डाळी, सलाद किंवा पुलाव यांमध्ये मेथीचे दाणे टाकू शकता.
- मेथीची भाजी तुम्ही खाऊ शकता. तसेच मेथीच्या पानांचा सलादमध्येही समावेश करू शकता. जेवण करताना कच्ची मेथीची भाजी खाऊ शकता.
'या' गोष्टींची घ्या काळजी
डायबिटीसच्या रूग्णांनी मेथीचं सेवन करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण याने ब्लड शुगरची लेव्हल फार कमी होऊ शकते. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी यांचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही एखाद्या आजाराची औषधं घेत असाल तर याच्या सेवनाआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.