सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं? वाचा काय सांगतात एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:06 AM2024-06-17T10:06:24+5:302024-06-17T10:09:17+5:30

अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी काही मसाल्यांचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कोणत्या गोष्टीचं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं.

Nutritionist tells infused water and detox drinks for different health problems | सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं? वाचा काय सांगतात एक्सपर्ट

सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं? वाचा काय सांगतात एक्सपर्ट

भारतीय किचनमध्ये वेगवेगळे मसाले भरून ठेवलेले असतात. हे मसाले वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासोबतच आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. ज्याबाबत लोकांना फार कमी माहिती असते. अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी काही मसाल्यांचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कोणत्या गोष्टीचं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. ते आज आपण जाणून घेणार आहोत.

न्यूट्रिशनिस्ट चितवन गर्ग यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. 

पचनासाठी ओव्याचं पाणी

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनक्रिया चांगली होते. तसेच या पाण्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी

सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मुनक्यामध्ये फायबर भरपूर असतं. यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

इन्सुलिन रेसिस्टेंससाठी दालचीनी

पाण्यात दालचीनी पावडर टाकून प्यायल्याने शरीराला अ‍ॅंटी-बायोटिक आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी व अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. दालचीनीच्या पाण्याने इन्सुलिन रेसिस्टेंसमध्ये मदत मिळते.

थायरॉइडसाठी धण्याचं पाणी

धण्यापासून शरीराला अनेक फायदे मिळतात. ज्यात थायरॉइडचाही समावेश आहे. धण्यामध्ये ए, सी, के आणि फोलेट असतं. सोबतच यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात. जे थायरॉइड सोबतच वजन कमी करण्यास मदत करतात.

PCOS मध्ये मेथीचं पाणी

PCOS ची समस्या असेल तर मेथीच्या दाण्याचं पाणी प्यायल्याने मदत मिळते. मेथीचं सेवन केल्याने पाळीची समस्या दूर करण्यास मदत मिळते. मासिक पाळी वेळेवर आणि नियमित येते.

इन्फ्लेमेशन आणि अंगदुखीसाठी हळदीचं पाणी

हळदीचे शरीराला अनेक फायदे मिळतात. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व आढलतात. जे शरीराचं दुखणं आणि आतील सूज दूर करण्यास मदत करतात.

हृदयासाठी काळी वेलची

काळ्या वेलचीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-सेप्टिक तत्व भरपूर असतात. या वेलचीचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते आणि बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही काळी वेलचीचं पाणी फायदेशीर ठरतं. या पाण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

फॅटी लिव्हरसाठी आल्याचं पाणी

तसा तर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. चहामध्येही याचा वापर भरपूर होतो. पण सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात जे फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यास मदत करतात. तसेच मेटाबॉलिज्मही मजबूत करतात. 

Web Title: Nutritionist tells infused water and detox drinks for different health problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.