रोज सोया चंक्स खाल्ल्याने काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले एकापेक्षा एक फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:27 PM2024-08-28T15:27:16+5:302024-08-28T15:40:33+5:30
Soya Chunks Benefits : न्यूट्रिशनिस्ट शांभवी यांनी रोज १०० ग्रॅम सोया चंक्स खाल्ल्याने काय फायदे मिळतात याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे.
Soya Chunks Benefits : सोया चंक्स म्हणजे सोयाबीनच्या वड्यांची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. शाकाहारी लोक ही भाजी आवडीने खातात. कारण या सोया चंक्समधून शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं. सोया चंक्सचा वापर वेगवेगळ्या भाज्या, पुलाव किंवा फास्ट फूडमध्ये केला जातो. सोया चंक्सची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट शांभवी यांनी रोज १०० ग्रॅम सोया चंक्स खाल्ल्याने काय फायदे मिळतात याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे.
सोया चंक्सचे फायदे
न्यूट्रिशनिस्ट शांभवी यांच्यानुसार, रोज १०० ग्रॅम सोया चंक्स खाल्ल्याने शरीराला ५४ ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि शरीर फीट राहतं. सोया चंक्समध्ये भरपूर प्रोटीन असतं तसेच यात सगळे ९ अमिनो अॅसिडही असतात.
सोया चंक्स खाल्ल्याने शरीरावर काय साइड इफेक्ट्स होतात याबाबत न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, याच्या सेवनाने गायनेकोमॅस्टियासारखी समस्या होत नाही. सोयामध्ये फीटोएस्ट्रोजन्स असतात, पण शरीर जे एस्ट्रोजन तयार करतं हे फीटोएस्ट्रोजन्स त्यापेक्षा फार कमी असतं. अशात गायनेकोमॅस्टियाचा धोका कमी राहतो.
सोया चंक्स कसे खावेत याबाबत न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, सोया चंक्स भिजवून खाण्यासोबतच पनीर, चीज किंवा दह्यासोबत खाऊ शकता. ज्यामुळे प्रोटीन इन्टेक आणखी वाढतं.
सोचा चंक्स खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. या चंक्सचा प्रभाव बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर दिसतो. वजन कमी करणारे लोकही सोया चंक्सना आपल्या आहाराचा भाग बनवू शकतात. हाडे मजबूत करण्यासही याने मदत मिळते. यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात फायबरही भरपूर असल्याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील होत नाही.