न्यूट्रिशनिस्टने सांगितली तरूणांचं पोट साफ न होण्याची कारणं, सोबतच सांगितले काही उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:13 PM2024-08-28T13:13:48+5:302024-08-28T13:14:32+5:30

Reason For Constipation Among Youngsters :आजकाल तरूणांमध्ये अधिक वाढली आहे. अशात डॉक्टर अंजली मुखर्जी यांनी तरूणांमध्ये ही समस्या का होते याची कारणे सांगितली आहेत. 

Nutritionist tells why young people have trouble cleaning their stomach | न्यूट्रिशनिस्टने सांगितली तरूणांचं पोट साफ न होण्याची कारणं, सोबतच सांगितले काही उपाय!

न्यूट्रिशनिस्टने सांगितली तरूणांचं पोट साफ न होण्याची कारणं, सोबतच सांगितले काही उपाय!

Reason For Constipation Among Youngsters : अनेक लोकांना आजकाल पोट साफ न होण्याची समस्या होत असते. खासकरून लहान मुले आणि तरूणांमध्ये ही समस्या जास्त होऊ लागली आहे. आधी ही समस्या ४० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये अधिक होत होती. पण आजकाल तरूणांमध्ये अधिक वाढली आहे. अशात डॉक्टर अंजली मुखर्जी यांनी तरूणांमध्ये ही समस्या का होते याची कारणे सांगितली आहेत. 

डॉक्टर अंजली यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, "हा व्हिडीओ अशा तरूणांसाठी आहे ज्यांना गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे. ही समस्या आता २० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या तरूणांमध्ये होत आहे. याचं कारण आहे मॉडर्नायजेशन, जास्त प्रोसेस्ड फूड खाणं, फिजिकल अॅक्टिविटी कमी आणि फार जास्त तणाव".

त्यांनी सांगितलं की, "तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहत नाहीत. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्ही समोर असता किंवा फोन बघत असता. अशात फिजिकल अॅक्टिविटी जास्त होत नाही. याचा प्रभाव थेट पोटावर पडतो. तुम्ही जे खाता, पिता किंवा विचार करता त्याचा पोटावर प्रभाव पडतो. तुम्ही जर रात्री उशीरा खाता किंवा जास्त कार्ब्स खाता, ब्लू लाईटच्या संपर्कात जास्त राहता, तसेच तुम्ही फार जास्त तणावात राहत असाल, जास्त धुम्रपान करत असाल, रात्री उशीरा झोपत असाल तर या गोष्टींचा पोटावर नकारात्मक प्रभाव पडतो. हे लक्षात ठेवा की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात".

पोट निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय

- पोट निरोगी ठेवण्यासाठी रोज वेळेवर जेवण करणं फार गरजेचं आहे. रोज एकाच वेळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण केलं पाहिजे. 

- पचन तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज किमान तीन ते चार लीटर पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

- रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश असावा. तसेच फायबर असलेल्या पदार्थांचा किंवा भाज्यांचं सेवन करावं. याने पोट साफ होण्यास मदत मिळते.

- रोज जेवण झाल्यावर काही वेळ चालावे. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
 

Web Title: Nutritionist tells why young people have trouble cleaning their stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.