शरीरात वाढलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे 6 खास उपाय, वेगाने कमी होईल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 10:34 AM2022-12-07T10:34:33+5:302022-12-07T10:35:32+5:30

Weight Loss : अनेक असे फूड्स असतात, जे थेटपणे वजन वाढवण्याचं काम करतात. तेच काही असेही फूड्स असतात जे वजन कमी करण्याचं काम करतात.

Nutritionist told 6 easy and effective tips to reduce extra fat and cleansing body naturally | शरीरात वाढलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे 6 खास उपाय, वेगाने कमी होईल वजन

शरीरात वाढलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे 6 खास उपाय, वेगाने कमी होईल वजन

googlenewsNext

Weight Loss : अनहेल्दी डाएटमुळे लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकांमुळे शरीरात केवळ टॉक्सिनच जमा होतं असं नाही तर  वजनही वाढतं. अशात डॉक्टर पौष्टिक पदार्थांच सेवन करण्याचा सल्ला देतात. 

फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आणि डाइटीशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, लठ्ठपणा आज एक मोठी समस्या झाला आहे. याचे शिकार केवळ मोठेच नाही तर लहानही होत आहेत. अनेक असे फूड्स असतात, जे थेटपणे वजन वाढवण्याचं काम करतात. तेच काही असेही फूड्स असतात जे वजन कमी करण्याचं काम करतात.

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी फिजिकल अॅक्टिविटीसोबत हेल्दी डाएटची महत्वाची भूमिका आहे. जर तुम्ही एक्सरसाइजसाठी वेळ काढू शकत नसाल आणि तुमचं वजन वाढत असेल तर आपल्या आहारात काही बदल करून तुम्ही वजन कंट्रोल करू शकता.

ग्रीन टी ने मिळतो फायदा

वजन कमी करणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही ग्रीन टी चं सेवन केलं पाहिजे. ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. हे ड्रिंक कमी करण्यासोबतच, ब्लड प्रेशरही कमी करतं आणि शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढण्यास मदत करतं. यात साखर किंवा मध मिक्स करणं टाळा, नाही तर याने कॅलरी इनटेक वाढू शकतं.

एक्सरसाइज नक्की करा

शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी डाएटमध्ये बदल करण्यासोबतच काही वेळ एक्सरसाइजसाठीही वेळ काढा. जर तुम्ही रोज 20 ते  25 मिनिटे एक्सराइज केली तर याने तुम्हाला मदत मिळेल. याने शरीर फीट राहतं आणि पचनही चांगलं राहतं.

लिंबू-आल्याचं डिटॉक्स ड्रिंक

आपल्या दिवसाची सुरूवात लिंबू आणि आल्याच्या ड्रिंकने करू शकता. याने ना केवळ शरीरातील टॉक्सिन बाहेर काढतं. सोबतच वजन कमी करण्यासही मदत करतं. डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं आलं किसून टाका. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात.

प्रोटीनचं प्रमाण वाढवा

वजन कमी करण्यात प्रोटीन फार फायदेशीर असतं. याने फॅट कमी करून मसल्स तयार होतात. दिवसावेळी आपल्या डाएटमध्ये नट्स, चणे, बीन्स, डाळी आणि फळांचा समावेश नक्की करा. याने भूक कंट्रोल करता येईल. ज्यामुळे फॅट बर्न करून वजन कमी करण्यास मदत मिळेल.

फ्रूट्स आणि रॉ फूडचा आहारात करा समावेश

डिनरमध्ये हेवी आहार घेणं टाळा. त्याजागी रात्री तुम्ही काकडी, गाजर, स्प्राउट्स, फळं, हिरव्या पालेभाज्या आणि सलाद खाऊ शकता. याने शरीराला शक्ती आणि आराम मिळेल. फळ आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असतं. 

भरपूर पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी पाण्यापेक्षा चांगलं काहीच नाही. त्यामुळे ऋतू कोणताही असो दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्यावं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. पाणी प्यायल्याने बॉडी हाइड्रेटेड राहते. याने तुम्हाला एनर्जीही मिळेल. 

Web Title: Nutritionist told 6 easy and effective tips to reduce extra fat and cleansing body naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.