कॅफीनपेक्षाही घातक असतं चहामधील 'हे' तत्व, आतड्यांचं होईल मोठं नुकसान; जाणून घ्या उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:16 PM2024-08-26T16:16:16+5:302024-08-26T16:17:11+5:30
डॉक्टर नेहमीच चहाचे शरीराला होणारे नुकसानही सांगत असतात. अनेकांना चहा पिणं किती नुकसानकारक आहे हे माहीत असतं. तरी सुद्धा ते चहा पिणं सोडत नाहीत.
चहा पिऊनच जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात होते. काही लोक दिवसभरातून अनेक चहा पितात. सकाळच्या गरमागरम चहाने भलेही फ्रेश वाटत असेल, पण डॉक्टर नेहमीच चहाचे शरीराला होणारे नुकसानही सांगत असतात. अनेकांना चहा पिणं किती नुकसानकारक आहे हे माहीत असतं. तरी सुद्धा ते चहा पिणं सोडत नाहीत.
सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत असतं की, चहामध्ये कॅफीन नावाचं तत्व असतं जे नुकसानकारक असतं. मात्र, चहामध्ये आणखी एक नुकसानकारक तत्व असतं ज्याबाबत न्यूट्रिशनिस्ट लवलीन कौर यांनी माहिती दिली आहे.
चहामधील दुसरं घातक तत्व
चहामध्ये टॅनिन नावाचं एक एझांइम असतं. जर हे तत्व शरीरात जास्त प्रमाणात गेलं आतड्यांची इनर लायनिंग पातळ करू शकतं. याने पोटाची पीएच लेव्हलही कमी होऊ शकते. बरेच लोक डोकेदुखी कमी करण्यासाठी, आळश घालवण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी अनेकदा चहा पितात. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही चहाऐवजी दुसरे पर्याय निवडू शकता. असेच काही उपाय न्यूट्रिशनिस्ट लवलीन कौर यांनी सांगितले आहेत.
काय कराल उपाय?
तुम्ही ६ ते ७ काळी मिरे एका तास पाण्यात उकडून घ्या. नंतर ही काळी मिरी पाण्यासोबत सेवन करा. यात पायपनिर असतं जे न्यूरोन्सना रिलॅक्स करतं. याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
डायजेशन
जर तुम्हाला खाल्लेलं अन्न पचवायचं असेल तर अर्धा अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा एक ग्लास पाण्यात उकडून घ्या. यात थोडा लिंबाचा रस टाका आणि हे पाणी एक एक घोट करत सेवन करा.
एनर्जी
तुम्ही आळस दूर करण्यासाठी चहाचं सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. एक ग्लास लिंबू पाण्यात काळं मीठ टाका. त्यात खोबऱ्याचा एक तुकडा, २ खजूर आणि ६ ते ७ मनुके टाका. हे पाणी सेवन करा. याने तुम्हाला एनर्जी मिळेल.