२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, न्यूट्रिशनिस्टने सांगितली योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:39 AM2024-10-16T11:39:34+5:302024-10-16T11:40:48+5:30

Weight Loss Tips : एक्सपर्टही नेहमीच सांगत असतात की, वजन कमी करणं काही सोपं काम नाही. मात्र, तुम्ही जर योग्य पद्धत वापरली तर तुम्हाला लवकर फायदा दिसू शकतो. 

Nutritionist told how drinking 2 glass water before every meal help weight lost fast | २ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, न्यूट्रिशनिस्टने सांगितली योग्य पद्धत!

२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, न्यूट्रिशनिस्टने सांगितली योग्य पद्धत!

Weight Loss Tips : एकदा वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकदा तर लोक चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, अशात त्यांना काहीच फायदा होत नाही. एक्सपर्टही नेहमीच सांगत असतात की, वजन कमी करणं काही सोपं काम नाही. मात्र, तुम्ही जर योग्य पद्धत वापरली तर तुम्हाला लवकर फायदा दिसू शकतो. 

वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय असतात आणि त्यातील एक उपाय म्हणजे जेवण करण्याआधी पाणी पिणे. फेमस न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांच्यानुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी दोन ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत कशी मिळते, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पाणी पिऊन वजन कसं कमी होतं?

द मॉडल हेल्थ शो पॉडकास्टवर एलनने सांगितलं की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. एलन एरागॉननुसार, जेवण करण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि कॅलरीचं प्रमाण कमी होतं.

कधी मिळतो जास्त फायदा?

एलनने सांगितलं की, 'तुम्ही प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास साधं पाणी पिऊ शकता. याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही जास्त खात नाहीत. खासकरून रात्रीच्या जेवणाआधी हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो'.

जेवणासोबत पाणी प्यावे का?

एलननुसार, जेवणासोबत थोडं पाणी प्यावे. जर तुम्ही जेवणाआधी पाणी प्यायले तर जेवण करताना तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे लोकांनी जेवण करताना पाणी प्यायल्याने पचन योग्यपणे होणार नाही याची काळजी करू नये. 

अनेक रिसर्चमधूनही याचा खुलासा झाला आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पाण्यात कॅलरी कमी असतात, याने पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही कमी खाता. रिसर्चमध्ये आढळलं की, जे लोक जेवणाआधी जवळपास  ५०० मिली पाणी पित होते, त्यांचं वजन १२ आठवड्यांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत जास्त कमी झालं.

Web Title: Nutritionist told how drinking 2 glass water before every meal help weight lost fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.