जेवण केल्यावर अजिबात करून नका 'या' चुका, जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:35 PM2024-06-12T14:35:35+5:302024-06-12T14:36:00+5:30
After Meal Mistake : बरेच लोक जेवणानंतर काही अशा चुका करतात ज्यामुळे आहारातील पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
After Meal Mistake : आपण जेवण जर केलं नाही तर जगणं अवघड होईल. त्यामुळे आपण रोज जेवण करतो. जेवणात वेगवेगळी पदार्थ खातो. जे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व देतात. पण बरेच लोक जेवणानंतर काही अशा चुका करतात ज्यामुळे आहारातील पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. या चुका कोणत्या आहेत याबाबत न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर कोणत्या चुका टाळायला हव्या.
जेवल्यावर टाळा या चुका
लगेच झोपू नये
बरेच लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात. पण ही एक मोठी चूक आहे. कारण यामुळे तुम्हाला अॅसिडिटी आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. छातीत जळजळ आणि पोटदुखीही होऊ शकते. तसेच जेवल्यावर लगेच झोपल्याने पचनही चांगलं होत नाही.
लगेच फोन हाती घेणे
जेवण केल्यावर लगेच फोन बघायला सुरूवात करणंही नुकसानकारक आहे. जास्तीत जास्त लोकांना ही सवय असते. ते जेवण झालं की, लगेच बेड किंवा सोफ्यावर बसून फोन बघतात. यामुळे पचनास समस्या होते आणि पोट बाहेर येण्याची समस्या होते.
चहा किंवा कॉफी
बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जेवण केल्यावर चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिक रिफ्लक्सची समस्या होते. यामुळे छातीत जळजळ आणि पोट खराब होतं.
लगेच कामाला सुरूवात
बरेच लोक ऑफिसमध्ये जेवण केल्यावर लगेच कामाला लागतात. असं करणं चुकीचं आहे. जेवण केल्यावर काही वेळ चालावं त्यानंतर काम करावं. असं केल्याने तुमचं वजन वाढणार नाही.
दोष देणे
बरेच लोक आपल्या आवडीचे पदार्थ खातात आणि काही समस्या झाली तर लगेच दोष देणं सुरू करतात. असं अजिबात करू नये. असं केल्याने अन्न योग्यपणे पचत नाहीत आणि पोटासंबंधी समस्या होतात.
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जेवण निदान काही वेळ वॉक केलाच पाहिजे. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते आणि ब्लड शुगर लेव्हलही संतुलित राहते. जेवण केल्यावर लगेच कोल्ड ड्रिंक्सही पिऊ नये. याने पोटात अॅसिड वाढतं. तसेच जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये.