१० किलो वजन कमी होण्याचा न्यूट्रिशनिस्टचा दावा, 'या' खास ज्यूसचं रोज करावं लागेल सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:42 AM2024-06-03T09:42:22+5:302024-06-03T09:42:58+5:30
Weight Loss : आजकालची चुकीची लाइफस्टाईल, खाण्या वेळ न पाळणं, तळलेले मसालेदार पदार्थ खाणं, पुरेशी झोप न घेणे अशा गोष्टींमुळे अनेकांना ही समस्या होत आहे.
Weight Loss : वजन वाढणे किंवा पोटावरील चरबी वाढणे अशा समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहेत. कमी वयातही लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाचे शिकार होत आहेत. लठ्ठपणा वाढला तर शरीरात अनेक गंभीर आजार घर करतात. ज्यामुळे लोकांचं जगणं अवघड होतं. आजकालची चुकीची लाइफस्टाईल, खाण्या वेळ न पाळणं, तळलेले मसालेदार पदार्थ खाणं, पुरेशी झोप न घेणे अशा गोष्टींमुळे अनेकांना ही समस्या होत आहे.
इतकंच नाही तर वजन जास्त वाढल्याने डायबिटीस, हार्ट डिजीज, कॅन्सर, कमी दिसणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, कंबरदुखी, आळस, थकवा अशा अनेक आजांराचा धोका असतो. अशात जर तुमचं वजन जास्त वाढलं असेल तर ते तुम्ही लगेच कमी करण्यावर भर दिला पाहिजे. तसे तर वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा सिंह यांच्यानुसार तुम्ही दूधी भोपळ्याचा ज्यूस पिऊन १० किलो वजन कमी करू शकता.
डॉ. शिखा सिंह म्हणाल्या की, रोज आहारात एक ग्लास दूधी भोपळ्याच्या ज्यूसचा समावेश कराल तर तुम्हाला लवकर वजन कमी करण्यास मदत मिळेल. तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊन पोट आत जाईल. सोबतच कंबरही बारीक होईल.
दूधी भोपळ्याच्या ज्यूसचे फायदे
न्यूट्रिशनिस्टनुसार, दूधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर असतात. तसेच यात आयर्न, फोलेट, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही असतं. हे एक चांगलं ड्यूरेटिक आहे जे वॉटर रिटेंशनमुळे होणाऱ्या लठ्ठपणापासून बचाव करतं.
दूध भोपळ्याच्या ज्यूसमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तसेच दूधी भोपळ्यामध्ये ९२ टक्के पाणी असतं. सोबतच याने लिव्हर डिटॉक्सही होतं. इतकंच नाही तर त्वचा आणि केसांनाही याचा फायदा मिळतो.
पचन चांगलं होतं
पचनक्रिया खराब झाल्याने फॅट वाढू लागतं. नंतर अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते. डायजेशन सुधारण्यासाठी दूधी भोपळ्याचा ज्यूसचं नियमित सेवन करावं.
कसा कराल तयार?
१ दूधी भोपळा चांगल्याप्रकारे धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता एका ज्यूसरमध्ये हे तुकडे टाकून त्यांचा ज्यूस बनवा. नंतर हा ज्यूस एका भांड्यात गाळून घ्या. या ज्यूसमध्ये थोडं काळं मीठ टाका. तसेच त्यात थोडां लिंबाचा रसही टाका. हे चांगलं मिक्स करून यांचं सेवन करा. दूधी भोपळा जर कडू लागत असेल तर त्याचा ज्यूस बनवू नका.