ओट्स की मुसली, कोणता पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी बेस्ट? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:38 PM2021-07-08T17:38:40+5:302021-07-08T17:49:09+5:30

वजन कमी करण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या पर्यायांच्या शोधात असता. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता याला महत्व आहे. सध्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त ओट्स व मुसली (cereals) यांना महत्व दिले जात आहे. मात्र या दोन्ही पर्यायांपैकी सर्वात जास्त कोणता पर्याय चांगला आहे हे आज जाणून घेऊया.

Oats or cereals, which is the best option for weight loss? Learn to take | ओट्स की मुसली, कोणता पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी बेस्ट? घ्या जाणून

ओट्स की मुसली, कोणता पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी बेस्ट? घ्या जाणून

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या पर्यायांच्या शोधात असता. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता याला महत्व आहे. सध्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त ओट्स व मुसली (cereals) यांना महत्व दिले जात आहे. मात्र या दोन्ही पर्यायांपैकी सर्वात जास्त कोणता पर्याय चांगला आहे हे आज जाणून घेऊया.
दोघांमध्ये फरक काय?
ओट्स किंवा मुसली हे अन्नधान्यापासून बनवलेले असतात. यात फरक असा आहे की मुसली तुम्ही न शिजवताही खाऊ शकता तर ओट्स तुम्हाला शिजवावे लागतात. मुसली शक्यतो थंड खातात तर ओट्स गरम करून खातात.

गुणधर्मांमध्ये काय फरक?
ओट्सपेक्षा मुसलीमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. पण मुसलीमध्ये साखर जास्त प्रमाणात असते. तुम्ही शुगरफ्री मुसलीही खाऊ शकता. पण कॅलरीही ओट्समध्ये कमी असते.

दोघांना खाण्याचे फायदे

  • मुसली - मुसली मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. सिरिअल्स खाल्ल्यावर पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते. मुसलीमध्ये बीटा ग्लुटेन नामक फायबर असते. त्यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्या चांगले राहते. तसेच यामध्ये नट्स असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
  • ओट्स-ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो. मात्र एवढंच नाही तर सौंदर्यांत भर घालण्यासाठीदेखील तुम्ही ओट्सचा वापर करू शकता. सहाजिकच आजारपण दूर ठेवण्यासाठी तुम्ही ओट्स आहारात असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती बळकट होते. जर तुम्ही नियमित ओट्स खात असाल तर तुमची रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण ओटसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असते.
     

वजन कमी करण्यासाठी काय चांगले?
ओट्स आणि मुसलीमध्ये ओट्स हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.मुसलीमध्ये कॅलरी जास्त असतात. तसेच वेटलॉससाठी आपल्याला कमी शुगर खाणं गरजेचं आहे. त्यामुळे ओट्स हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: Oats or cereals, which is the best option for weight loss? Learn to take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.