लठ्ठपणामुळे रोज होतात या समस्या, केळी आणि बडीशेप ठरेल रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 02:43 PM2024-04-06T14:43:16+5:302024-04-06T14:44:02+5:30
लठ्ठपणामुळे ही समस्या वाढते आणि अनेकांचा जीव जातो. तसेच लठ्ठपणामुळे पोटावर अधिक दबाव पडतो आणि त्यामुळे अॅसिडिटी, आंबट ढेकर आणि पोटात जळजळ अशा समस्या होतात.
लठ्ठपणाची समस्या जगभरातील लोकांना भेडसावत आहे. लठ्ठपणा वाढला की, शरीर अनेक आजारांचं घर बनतं. त्यातील एक मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे हृदयरोग. लठ्ठपणामुळे ही समस्या वाढते आणि अनेकांचा जीव जातो. तसेच लठ्ठपणामुळे पोटावर अधिक दबाव पडतो आणि त्यामुळे अॅसिडिटी, आंबट ढेकर आणि पोटात जळजळ अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
बडीशेप
बडीशेपमध्ये कार्मिनेटिव गुण असतात. जे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. शोधानुसार, बडीशेपचं सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. जेवण केल्यावर एक चमचा बडीशेप खा किंवा एक चमचा बडीशेप 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यात उकडून घ्या आणि ते पाणी प्या. याने अॅसिडिटीची समस्या दूर होईल.
थंड दूध
थंड दूध अॅसिडिटी दूर करण्यासाठी बेस्ट उपाय मानला जातो. कारण याने पोटातील अॅसिड दूर होते आणि जळजळही दूर होते. पोट शांत करण्यासाठी हळूहळू एक ग्लास थंड दूध प्यावं. यात एक चमचा मध टाकलं तर जास्त फायदा मिळेल.
आल्याचा चहा
आल्यामध्ये इन्फ्लामेटरी गुण असतात जे अॅसिडिटी कमी करण्यास आणि पचन तंत्र शांत करण्यास मदत करतात. आल्याचा चहा तयार करण्यासाठी आल्याचे तुकडे 10 मिनिटे पाण्यात उकडून घ्या. हे गाळू यात थोडं मध किंवा लिंबाचा रस टाका. अॅसिडिटी आणि पोटाची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा या चहाचं सेवन करा.
केळी
केळींमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. जे पोटातील अॅसिड दूर करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतं. त्याशिवाय केळींमध्ये एंटासिड असतं जे अॅसिडिटी लगेच दूर करण्यास मदत करतं. जेव्हाही या समस्या झाल्या तर लगेच एक केळी खावी.