दहा पटीने वाढला बालकांमध्ये लठ्ठपणा; पौष्टिक आहाराकडे पालकांचं दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:33 AM2021-12-09T08:33:57+5:302021-12-09T08:34:17+5:30
दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना योग्य आहार मिळणे आवश्यक असते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील वास्तव फारच चिंताजनक आहे.
योगेश पांडे
नागपूर - मागील काही काळापासून लहान मुला-मुलींमधील जंकफूडचे वाढते प्रमाण, खेळण्याचा अभाव, आदी बाबी चिंताजनक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. मात्र, अनेक पालकांकडून बालकांच्या पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाच वर्षांखालील मुला-मुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे.
२०% मुले-मुली तर अतिकृश गटात येतात. या वयोगटातील ३३.९ टक्के बालके ही कृश होती. चारच वर्षांत मुलांमधील ॲनिमियात २५.८ टक्क्यांनी वाढ. खासगी केंद्रांवर लस घेण्याचे प्रमाण वाढले. २०१९-२० मध्ये २०.७ टक्के बालकांचे लसीकरण खासगी केंद्रांवर
केवळ साडेचार टक्के बालकांना योग्य आहार
दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना योग्य आहार मिळणे आवश्यक असते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील वास्तव फारच चिंताजनक आहे. सहा महिने ते २४ महिने या वयोगटातील केवळ ४.६ टक्के बालकांनाच आवश्यक पोषण आहार मिळतो आहे. २०१५-१६ मध्ये हीच संख्या ५.९ टक्के इतकी होती.