लठ्ठपणा आजारासाठी निमंत्रण, काय काळजी  घ्याल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 11:52 AM2023-11-05T11:52:12+5:302023-11-05T11:53:15+5:30

लठ्ठपणामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या केव्हा इतक्या अडचणीच्या ठरतात कि, तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते.

Obesity is an invitation to disease, what care? | लठ्ठपणा आजारासाठी निमंत्रण, काय काळजी  घ्याल? 

लठ्ठपणा आजारासाठी निमंत्रण, काय काळजी  घ्याल? 

लठ्ठपणा म्हटलं कि, आपल्या डोळ्यासमोर तत्काळ जाडजूड व्यक्तीची प्रतिमा येते. सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाले तर लठ्ठपणा हा बहुतांश आजारांचा पाया असतो. आजराचा राजा म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आपसूचकच निमंत्रण दिले जाते. हा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दैनंदिन आयुष्यात काही बदल करावेसे लागतात. काही जण अपयशी होतात तर काही यशस्वी होतात. मात्र हे बदल केले नाही तर आरोग्याच्या मोठ्या समस्यांचा आपल्या सामना करावा लागतो. 

लठ्ठपणामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या केव्हा इतक्या अडचणीच्या ठरतात कि, तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य वेळीच लठ्ठपणा दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लठ्ठपणामुळे आपल्याला  मधुमेह ( डायबेटिज ), रक्तदाब (ब्लड प्रेशर)  संयुक्त वेदना (जॉइंट पेन) विशेष म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग (कॅन्सर) शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे होतात. मानवी शरीराच्या अनेक भागांत चरबी वाढत असते. या चरबीचा शरीरातील मुख्य अवयवांवर परिणाम हाेताे.

लठ्ठपणा वाढण्याची दोन प्रमुख कारणे
लठ्ठपणा हा आनुवंशिक असू शकतो. घरातील सदस्यांना लठ्ठपणा असेल तर त्यामुळेसुद्धा अनेकवेळा त्या व्यक्ती लठ्ठ होत असतात. 
बाह्यकारणांमुळे लठ्ठपणा वाढीस लागत असतो. यामध्ये तळलेले, जास्त कॅलरी असलेले खाद्यपदार्थ खाणे, तसेच अनेकवेळा बैठ्या स्वरूपाचे काम करणे. शारीरिक हालचाल फार कमी प्रमाणात करणे. फास्ट आणि जंक फूड  खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा अधिक वाढते.

 काय काळजी  घ्याल ? 
 संतुलित आहार घेणे. 
 फळभाज्या आहारात ठेवा.  
  सकाळचा नाश्ता करताना मोड आलेले कडधान्य खा. 
 पुरेसा व्यायाम केला पाहिजे.  
 शारीरिक हालचाल गरजेची.
 लहान मुलांना घराबाहेरचे खेळ खेळण्यास प्रवृत्त करा.
 जंक फूड खाणे टाळावे.

 बॅाडी मास इंडेक्स  म्हणजे काय ?  
 आपल्या शरीरातील वजन नियंत्रणात आहे की, नाही यासाठी  बॅाडी मास इंडेक्स (बीएमआय ) मोजला जातो. यामध्ये शरीराची उंची आणि वजनाचं गुणोत्तर याला बीएमआय मोजणे असे म्हणतात. 
 बीएमआयमुळे शरीराचं वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की, नाही याची आपल्याला माहिती मिळते. विशेष म्हणजे आपल्या दिशा मिळते.  
  साधारणपणे १८.५ ते २४.५ च्या दरम्यान बीएमआय असावा. त्यापेक्षा २५ पेक्षा अधिक असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर बीएमआय ३० पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणाची सुरुवात आहे. त्यांनी त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.

शरीराचे वजन नियंत्रण केवळ लठ्ठ व्यक्तींनीच नाही तर सर्वसाधारण व्यक्तींनीसुद्धा आपले वजन आटोक्यात कशा पद्धतीने राहिल, यासाठी सतर्क असले पाहिजे. कारण एकदा का लठ्ठपणा वाढला की, अनेक आजार तुम्हला होत असतात. आपल्याकडे शहरी भागातही लठ्ठपणाच्या व्यक्ती आढळतात, असे नाही तर आता ग्रामीण भागातसुद्धा लठ्ठ व्यक्ती आढळून आल्यात. त्यापैकी काही जणांना शस्त्रक्रियांचीसुद्धा गरज लागलेली आहे. आम्ही लठ्ठ व्यक्तींवर शस्त्रक्रिया तेव्हाच करतो, जेव्हा त्या व्यक्तीने लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्व उपाय केले आहेत आणि त्या लठ्ठपणामुळे त्या व्यक्तींच्या आरोग्याला धोका आहे. आमच्याकडे सर्वांच्या शस्त्रक्रिया आम्ही करत नाही. त्याला सर्व आधीचे उपाय सुचविले जातात. ती व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी पात्र आहे का ? याची चाचपणी केली जाते. 
डॉ. संजय बोरुडे,
बेरियाट्रिक सर्जन, 
ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

Web Title: Obesity is an invitation to disease, what care?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.