लठ्ठपणा आजाराची कारणे कोणती? काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 09:47 AM2024-01-13T09:47:45+5:302024-01-13T09:50:40+5:30
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते.
Health Tips : गेल्या काही वर्षात आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या काळात विशेष कोरोना काळापासून मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून व्हिडीओ गेम, मोबाईल आणि लॅपटॉपवर खेळत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जंक फूड हा एका महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांची आहार शैली बदलली आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लठ्ठपणा म्हटले की आपल्याला वाटते केवळ तरुण आणि प्रौढांमध्ये हा आजार आढळतो.
...म्हणून चरबी वाढते
लठ्ठपणामुळे आपल्याला मधुमेह, रक्तदाब, संयुक्त वेदना विशेष म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग शरीरातील अतिरिक्त चरबी मुळे होतात. मानवी शरीराच्या अनेक भागात चरबी वाढत असते. चरबीपासून मुक्त होणाऱ्या हार्मोन्सचा शरीराच्या विविध भागावर परिणाम करून त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
लठ्ठपणा वाढण्याची कारणे :
लठ्ठपणा हा अनुवांशिक असू शकतो. घरातील सदस्यांना लठ्ठपणा असेल तर त्यामुळे सुद्धा अनेकवेळा त्या व्यक्ती लठ्ठ होत असतात.
यामध्ये बाह्यकारणामुळे लठ्ठपणा वाढीस लागत असतो. यामध्ये तळलेले, जास्त कॅलरी असलेले खाद्यपदार्थ खाणे, तसेच अनेकवेळा बैठ्या स्वरूपाचे काम करणे. शारीरिक हालचाल फार कमी प्रमाणात करणे. फास्ट आणि जंक फूड नियमित खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा अधिक वाढते.