लहान मुलांची स्मरणशक्ती लठ्ठपणामुळे होते कमी, जाणून घ्या कशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:31 PM2020-01-07T14:31:56+5:302020-01-07T14:34:58+5:30
लठ्ठपणाचे रूग्ण भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत जात आहेत.
(image credit- MDedge)
लठ्ठपणाचे रूग्ण भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत जात आहेत. त्यात लहान मुलांच प्रमाण अधिक आहे. एका रिसर्चनुसार लहान मुलांची स्मरणशक्ती कमी करण्यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात. त्यात लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक जाणवते. त्यांना लहानपणापासूनच हा त्रास व्हायला सुरूवात होत असते. वेरमॉन्ट यूनिवर्सिटी आणि येल यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी या अभ्यासात १० वर्षात १० हजार टिनेजरर्सचा डेटा घेतला. त्यानंतर याचे विश्लेषण केले. यात समाविष्ट असलेल्या मुलांचे परिक्षण करण्यात आले. तसंच त्यांचे ब्लड सॅम्पल्स सुध्दा तपासण्यात आले. दर दोन वर्षांनी त्यांची तपासणी केली जात होती. या अभ्यासानुसार ज्या मुलांचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) जास्त होते. त्या मुलांची मेमरी कमजोर होते.
(image credit- TOI)
वेरमॉन्ट यूनिवर्सिटीचे जेनिफर लॉरेंट यांनी असं सांगितले कि जास्त बीएमआई इन्डेस्क असलेल्या लोकांमध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होत जात असतो. सेरेब्रल कॉर्टेक्स हा मानवी शरीराच्या मेंदूतील असा भाग असतो. ज्यामुळे मेंदू बाहेरच्या बाजूने झाकला जातो. याच्या पातळ होण्याने कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची समस्या जास्त प्रभावित होत असते.
द लैंसेट जर्नल यात छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जगातील अनेक देशातील मुलं हे कुपोषण आणि लठ्ठपणाचा सामना करत आहेत. हे सगळे खाण्याच्या संस्कृतीत झालेल्या बदलाचे परिणाम आहेत. यात असं सुध्दा नमुद करण्यात आलं आहे की काही दिवसात अनेक ठिकाणी सुपर मार्केट्सची संख्या वाढणार आहे. आणि ताज्या भाज्या किंवा अन्नपदार्थ मिळण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
(image credit- weightlossmalasia)
यावर उपाय म्हणून लहान मुलांना व्यायाम करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. तसंच लठ्ठपणा आणि कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी पोषक आहार सुध्दा तितकाच महत्वाचा आहे. तसंच लहान मुलांना बाहेर खाण्याची सवय न लावता घरातच पौष्टीक पदार्थ खायला देणं गरजेचं आहे.