नकोसा वाटतो लठ्ठपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:32 AM2018-06-01T00:32:11+5:302018-06-01T00:32:11+5:30
रोजच्या धावपळीत भूक लागली म्हणून कुठलेही खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी मानवणारे नसते. आपल्या शारीरिक गरजेनुसार पाहिजे तेच खाणे केव्हाही चांगले.
स्वाती पारधी
रोजच्या धावपळीत भूक लागली म्हणून कुठलेही खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी मानवणारे नसते. आपल्या शारीरिक गरजेनुसार पाहिजे तेच खाणे केव्हाही चांगले. नियमबाह्य खाणेपिणे आपल्या शरीराला परवडणारे नसते. चांगले आणि वाईट गुण लक्षात घेऊन आहार घेतल्यास नकोसा वाटणारा लठ्ठपणा टाळता येऊ शकेल.
आजकालच्या जीवनशैलीचा विचार केल्यास आरोग्यदायी खाद्यसंस्कृती अंगीकारणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापली शरीररचना किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप करून शरीराच्या आवश्यकतेनुसार आहारात त्यात्या गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे. कारण, कोणत्याही गोष्टींचा आहारात समावेश करायचा असेल, तर त्याची गरज, फायदेतोटे लक्षात घेऊनच व्हावा. उगाचच डोळे बंद करून एखाद्या गोष्टींचा समावेश आहारात करणे चुकीचे आहे. चांगले, वाईट गुण लक्षात घेऊन खाल्ल्यास आपल्या शरीरावर भविष्यातील परिणाम टाळता येणे शक्य आहे.
वाचण्यात येणारी पुस्तके, आर्टिकल, बातम्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे समर्थन करण्यापेक्षा किंवा दिलेल्या माहितीचा एकाच बाजूचा विचार करू नये. सर्वांगाने विचार करून आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे आहे. तो न केल्यास वेगवेगळ्या आरोग्यसमस्येला तोंड द्यावे लागते. त्यामध्ये सद्य:स्थितीत महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर. याबद्दल बºयाच लोकांच्या मनात फारच शंकाकुशंका आहेत. दैनंदिन जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, योग्य औषधोपचार घ्यावा. अल्कोहोलवर नियंत्रण, कमी कर्बोदके असणाºया पदार्थांचे सेवन व संतुलित आहाराचा समावेश केल्यास फॅटी लिव्हरची तक्रार आपण नक्कीच कमी करू शकतो.
लिव्हर हा एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. म्हणूनच त्याला ‘फादर आॅफ आॅर्गन’ म्हणतात. लिव्हर हा पित्त निर्माण करतो. तो डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. नॅचरल रेंजपेक्षा लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅटचे प्रमाण जेव्हा वाढत जाते, तेव्हा फॅटी लिव्हर ही गंभीर समस्या भेडसावत जाते. त्यामध्ये फॅटी लिव्हरचे मुख्यत: दोन प्रकार आढळतात.
१. अल्कोहोल फॅटी लिव्हर
२. नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर
१ रोजच्या आहारात ज्यांचे अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळते तसेच अल्कोहोलमध्ये शर्करा आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असले, तर फॅटी लिव्हरची शक्यता असते. त्यामुळे अल्कोहोलिक लोकांना हा धोका जाणवणार आहे.२नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आहारात असलेले खूप जास्त कर्बोदके तसेच साखर तसेच खूप प्रमाणात फळे यामुळे होतो. वजन कमी करण्याच्या नादात किंवा खूप जास्त फॅटलॉस करण्याच्या नादात खूप लोक अतिक्रश डाएट करतात. त्यामुळे जेवणाऐवजी जास्त प्रमाणात केलेल्या फ्रूट डाएटमुळे व फळातील फ्रूक्टोझमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते. आजार पूर्णपणे बरा होत नाही; पण त्याची तीव्रता कमी करू शकतो.
मुख्यत: जेव्हा फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते, तेव्हाच साधारणत: पुढील लक्षणे आढळतात. थकवा, पोटदुखी, वजन कमी होणे, भूक कमी लागणे. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळली तर थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, परंतु यावर योग्य उपचार किंवा निदान न झाल्यास लिव्हरला इजा होऊन सॉरेसेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे पिलिया (कावीळ) सारखे आजार होऊन खूप जास्त प्रमाणात लिव्हरला सूज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेत १. शारीरिक परीक्षण २. रक्ततपासणी ३. अल्ट्रासाउंड टेस्टद्वारे इमेजिंग परीक्षण ४. लिव्हर बायोप्सीद्वारे तपासणी करून घ्यावी.
(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.) swatipardhi23@gmail.com