सतत हात धुण्याची सवय असेल तर तुमचा साबण स्लो नाही उलट 'या' गंभीर आजाराची आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:09 PM2022-07-20T16:09:17+5:302022-07-20T16:28:21+5:30

जर विषाणू किंवा जंतू तुम्हाला सतत घाबरवत असतील आणि तुम्ही वारंवार किंवा विनाकारण हात धुण्यास सुरुवात केली तर ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) नावाच्या आजाराचे ते लक्षण असू (Obsessive Compulsive Disorder Symptoms) शकते.

obsessive compulsive disorder symptoms causes and remedies | सतत हात धुण्याची सवय असेल तर तुमचा साबण स्लो नाही उलट 'या' गंभीर आजाराची आहेत लक्षणं

सतत हात धुण्याची सवय असेल तर तुमचा साबण स्लो नाही उलट 'या' गंभीर आजाराची आहेत लक्षणं

googlenewsNext

कोरोनाच्या या काळात स्वच्छता राखा असे सांगितले जात आहे. आपले हात वारंवार धुतल्याने, विषाणू आपल्या शरीरात पोहोचत नाही आणि आपण संसर्गापासून दूर राहू शकतो. परंतु, जर विषाणू किंवा जंतू तुम्हाला सतत घाबरवत असतील आणि तुम्ही वारंवार किंवा विनाकारण हात धुण्यास सुरुवात केली तर ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) नावाच्या आजाराचे ते लक्षण असू (Obsessive Compulsive Disorder Symptoms) शकते.

मेयो क्लिनिकच्या मते, OCD रुग्णाला असे वाटते की, तो सतत जंतूंच्या संपर्कात असतो आणि तो सतत भीतीच्या छायेत जगू लागतो. वास्तविक, मेंदूच्या आत सेरोटोनिन नावाचे रसायन असते आणि जेव्हा ते मेंदूमध्ये कमी होते, तेव्हा कोणतेही काम करताना मनात अपूर्णतेची भावना निर्माण होते आणि अशा स्थितीत तो व्यक्ती स्वच्छतेबाबत आवश्यकतेपेक्षा अधिक सतर्क होतो. लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

OCD ची लक्षणे

- सतत घाणीची भीती

- वारंवार हात धुणे

- नेहमी संशयात राहणे

- सर्व वेळ साफ-सफाई करण्याकडे कल

-अनियंत्रित होणं किंवा इतरांना त्यांच्याकडून इजा होण्याची भीती

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

- आंघोळीसाठी भरपूरवेळ घालवणे

- दिवसभर स्वच्छतेत व्यग्र राहणे

- सर्व वेळ विचार करत राहणे की, मी काही स्वच्छ करायला विसरलो तर नाही.

गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती

अशा ठिकाणी तोंड देताना हात थरथरणे आणि मूर्च्छा येणे इ.

त्यामुळे होणारे नुकसान -
या विकारामुळे संबंधित व्यक्तीचे जीवन विस्कळीत होते. असे लोक डिटर्जंटने आंघोळ करायला लागतात आणि हात इतके स्वच्छ करतात की हातांची त्वचा पोळून निघू शकते. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होऊन इतर कामे सोडून ते केवळ साफसफाईमध्ये व्यग्र राहतात. भीती, तणाव, चिडचिड, दुःख आणि निराशा यामुळे मानसिक स्थिती बिघडते. असे लोक घरात कोणालाच घुसू देत नाहीत आणि घराची पुन्हा-पुन्हा साफसफाई करत राहतात. अशा परिस्थितीत डॉक्टर समुपदेशन आणि वर्तणूक थेरपीच्या मदतीने रुग्णावर उपचार करतात आणि आवश्यकतेनुसार औषधांचा देखील अवलंब करतात.

Web Title: obsessive compulsive disorder symptoms causes and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.