अन्न गिळताना त्रास होतो का? या गंभीर आजाराचा असू शकतो प्राथमिक संकेत; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:04 AM2022-07-02T09:04:44+5:302022-07-02T09:06:27+5:30

Oesophageal Cancer Symptoms : एसोफेगल कॅन्सरशी संबंधित अनेक अशी लक्षणं आहेत जी इतकी कॉमन असतात की, त्यांना कॅन्सरच्या रूपात ओळखणं फार अवघड होऊ शकतं.

Oesophageal cancer symptoms causes risk factor diet | अन्न गिळताना त्रास होतो का? या गंभीर आजाराचा असू शकतो प्राथमिक संकेत; वेळीच व्हा सावध

अन्न गिळताना त्रास होतो का? या गंभीर आजाराचा असू शकतो प्राथमिक संकेत; वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Oesophageal Cancer Symptoms : आज जगभरात कॅन्सरमुळे लाखो लोकांचा जीव जातो. हा एक असा जीवघेणा आजार आहे ज्याचे सुरूवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. काही असे कॅन्सर आहेत जे फार कॉमन आहेत ज्यात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, स्कीन कॅन्सर आणि एसोफेगस कॅन्सर यांचा समावेश आहे. एसोफेगस फूड पाइप असतो म्हणजे अन्ननलिका. ही नलिका आपलं तोंड आणि पोटाला कनेक्ट करते. याला ग्रासनली असंही म्हटलं जातं.

एसोफेगल कॅन्सरशी संबंधित अनेक अशी लक्षणं आहेत जी इतकी कॉमन असतात की, त्यांना कॅन्सरच्या रूपात ओळखणं फार अवघड होऊ शकतं. पण ही लक्षणं वेळीच ओळखणं फार गरजेचं असतं. जेणेकरून वेळेवर उपचार घेता येतील. एसोफेगल कॅन्सरचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे अन्न गिळण्यास त्रास होणं हा आहे.

जर तुम्हाला काहीही खाताना किंवा पिताना, खोकलताना किंवा गिळताना त्रास होत असेल तर हा डिस्पॅगियाचा संकेत असू शकतो. जे एसोफेगल कॅन्सरचं सर्वात कॉमन लक्षण आहे.

कधी कधी गिळण्याचा प्रयत्न करत असताना अन्न नाक किंवा तोंडातून बाहेर येतं. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा अन्न परत एसोफेगसमध्ये येणं सोपं होतं. ज्यामुळे हे लक्षण आणखी खराब होतं.

यामुळे अन्न योग्यप्रकारे चावण्यातही समस्येचा सामना करावा लागू शकतो. या समस्येमुळे लोक अनेकदा अन्न न चावताच गिळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे आणखीन जास्त त्रास होतो. अनेकदा व्यक्तीला वाटतं की, त्याच्या गळ्यात काहीतरी अडकलं आहे. जसजसा हा कॅन्सर वाढतो तो अधिक वेदनादायी होत जातो. हळूहळू ग्रासनली छोटी होऊ लागते.

एसोफेगस कॅन्सरची लक्षणं

अन्न गिळण्यास त्रास होण्यासोबतच एलोफेगस कॅन्सरची इतरही काही लक्षणं आहेत. जसे की, थकवा, उलटी, अॅसिड रिफ्लक्स, हार्टबर्न, कफ, भूक न लागणे, छातीत वेदना आणि आवाज बदलणे.

एसोफेगस कॅन्सरचा धोका कसा कमी कराल

खराब लाइफस्टाईलमध्ये बदल करून तुम्ही एसोफेगस कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. अशात गरजेचं आहे की, तुम्ही स्मोकिंग तंबाखू आणि मद्यसेवन अजिबात करू नका.

त्यासोबतच गरजेचं आहे की, तुम्ही हेल्दी पदार्थांचं, फळांचं आणि भाज्यांचं सेवन करावं. आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या कलरफुल फळांचा आणि भाज्यांचा समावेश केल्यास फायदा मिळू शकतो. सोबतच वजन वाढणार नाही याचीही काळजी घ्यावी.

Web Title: Oesophageal cancer symptoms causes risk factor diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.