अगं, किती वाढतंय तुझं वजन!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:26 PM2017-11-10T17:26:28+5:302017-11-10T17:27:22+5:30

वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर?

Oh, how much is your weight! | अगं, किती वाढतंय तुझं वजन!..

अगं, किती वाढतंय तुझं वजन!..

Next
ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा.त्यासाठी सकाळपेक्षा संध्याकाळचा व्यायाम जास्त उपयुक्त.व्यायामात सातत्य मात्र असायला हवं..

- मयूर पठाडे

सपाटीला गेलेलं पोट.. हे अनेकांचं स्वप्न असतं, ध्येय असतं. याच स्वप्नानं त्यांना रात्रंदिवस झपाटलेलं असतं आणि त्याचसाठी त्यांचा अट्टहास असतो. व्यायाम सुरू करणाºया बहुतांश महिला आणि पुरुषांचं पहिलं ध्येय असतं, वजन कमी करायचं आणि पोटाचा आकार घटवायचा. ज्यांचं वजन कमी आहे, पोट व्यवस्थित सपाट आहे, अशा बायकांकडे तर स्त्रिया, हिनं काय जादू केली अशा पद्धतीनंच बघत असतात. वजन आणि पोट कमी करण्यासाठी तू काय केलंस, काय करतेस, आम्हालाही त्याच्या टिप्स दे.. यासाठी हटूनच बसतात. एवढंच नाही, तर कमी वजनाच्या आणि सपाट पोटाच्या तरुणी, बायका काय, कसा व्यायाम करतात, त्या काय खातात, पितात, त्यांचं रोजचं शेड्यूल काय, हे आधाशी नजरेनं सतत टिपत असतात.
मात्र आपण व्यायाम करतो की नाही आणि कोणत्या वेळेला व्यायाम करतो, यावरही तुमच्या वजनाचा काटा कुठे असेल हे ठरतं.
वजन कमी करण्यासाठी कोणती वेळ चांगली आहे, सकाळची कि संध्याकाळची हे शास्त्रीय पद्धतीनं शोधून काढण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी रीतसर एक पाहणीच केली. वजन कमी करण्याची इच्छा असणाºया स्त्रियांचे त्यांनी दोन गट केले. एका गटाला त्यांनी सकाळच्या वेळेला चालायला, व्यायाम करायला सांगितलं, तर दुसºया गटाला संध्याकाळी.
त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष रंजक होता. वजन कमी करण्यासाठी जे संध्याकाळच्या वेळी व्यायाम करीत होते, त्या महिलांचं वजन सकाळी व्यायाम करणाºया महिलांच्या तुलनेत बºयापैकी कमी झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर संध्याकाळचा व्यायाम जास्त उपयुक्त, पण लक्षात ठेवा, त्यात सातत्य मात्र असायला हवं..
अर्थात संशोधक हेही सांगायला विसरलेले नाहीत, की पहिल्यांदा महत्त्व व्यायामाला. संध्याकाळी नसेल जमत, तर सकाळी का होईना पण व्यायाम नक्की करा.

Web Title: Oh, how much is your weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.