कोरोना लस दिल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांत भोवळ येऊन कोसळले; वयोवृद्धाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:39 PM2021-02-09T16:39:49+5:302021-02-09T16:52:26+5:30
CoronaVaccine News & Latest Updates : अमेरिकेतील धक्कादायक घटना समोर आली आहे.रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच या माणसाला मृत घोषित करण्यात आले.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका वयोवृद्धानं कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांत मृत्यूचा सामना करावा लागला आहे. न्यूयॉर्क स्टेट हेल्थ कमिशनर डॉक्टर हावर्ड जुकर यांनी सांगितले की, ''लस घेतल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत ही व्यक्ती क्लिनिकमध्येच उपस्थित होती, यादरम्यान त्यांना कोणताही त्रास उद्भवला नाही. त्यानंतर काहीवेळानं ही व्यक्ती क्लिनिकच्या बाहेर निघाली त्यावेळी त्यांना भोवळ आल्यामुळे चालायला त्रास होत होता. त्या ठिकाणी असलेले सुरक्षारक्षक लगेचच या वयोवृद्ध माणसाजवळ पोहोचले आणि जवळच्या स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच या माणसाला मृत घोषित करण्यात आले. ''
या माणसाच्या नावाबाबत आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आतापर्यंत या व्यक्तीनं कोणती कोरोनाची लस घेतली याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. जुकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''अनेक पब्लिक हेल्थ तज्ज्ञांच्या मते कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग करून आपण या माहामारील नष्ट करू शकतो. मी न्यूयॉर्कच्या लोकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहे.''
दातांच्या पिवळेपणामुळे चारचौघात लाज वाटतेय? मग चिंता सोडा, या घरगुती उपायांनी मिळवा चमकदार दात
अमेरिकेतील जॅकब जेटविट्स सेंटर जानेवारीत एका मोठया लसीकरणासाठी सुरू करण्यात आलं होतं. न्यूयॉर्क शहरात अशा अनेक साईट्स आहेत. ही व्यक्ती मॅनहटनच्या जॅकब कन्वेंशन सेंटरमध्ये लस घेण्यासाठी पोहोचली होती.न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत १ मिलियन लोकांना लस देण्यात आली आहे. रोज १३ लाख शॉट्स अमेरिकेत दिले जात आहेत. आतापर्यंत ४२ मिलियन लसीचे डोज अमेरिकेतील लोकांना देण्यात आले आहेत. त्यातील १० टक्के लोकसंख्येला कमीत कमी एकदा लस देण्यात आली आहे.
लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार
या माणसाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याबाबत अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान लस घेतल्यानंतर प्रतिकुल परिणाम दिसून येत असल्याच्या खूप कमी घटना दिसून आल्या आहेत. डिसेंबरमध्ये लॉन्च झालेल्या लसीनं लाखो करोडो लोकांपर्यंत मदत पोहोचवली. तर काही लोकांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम आहे. याआधीही पॉलंडमध्ये ४८ वर्षीय महिलेला फायजरची लस घेतल्यानंतर जीव गमवावा लागला होता. लस घेतल्यानंतर १५ मिनिटं ही महिला क्लिनिकमध्ये होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत माहिती मिळालेली नाही.