Health tips: ओमेगा 3 फॅटी अॅसिड म्हणजे मेंदुसाठी वरदान, त्यासाठी प्या 'हे' ज्युसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 03:59 PM2022-04-17T15:59:33+5:302022-04-17T16:08:59+5:30
जाणून घ्या, की कुठली पेयं आहेत ज्याच्यातून भरपूर ओमेगा - 3 फॅटी ऍसिड मिळतं.
ओमेगा - 3 फॅटी ऍसिड आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूपच गरजेचं असतं. हे शरीरासोबतच मेंदूलाही मजबूत बनवतं. हे घेतल्यानं डिप्रेशन आणि एन्ग्झायटीची समस्याच दूर होते. याशिवाय डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार इत्यादीमध्येही ओमेगा- 3 फॅटी ऍसिड फायदेशीर आहे. (Health tips)
त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठीही हे उपयोगी आहे. मेंदूचे विकार याच्या सेवनाने कमी होऊ शकतात. मेटाबॉलिक सिंड्रोमच्या धोक्यालाही हे कमी करतं. गर्भावस्थेदरम्यान महिलांनी ओमेगा - 3 फॅटी ऍसिड घेतलं तर होणाऱ्या बाळाचा मेंदू हेल्दी होतो. सोबतच याचे अजून अनेक फायदे होतात. (omega 3 fatty acid for body)
याचे मुख्य स्रोत आहेत अक्रोड, सोयाबीन, फुलगोभी, साल्मन मासा, टुना मासा आणि अंडी. वाटलं तर उन्हाळ्यात आपण ओमेगा- 3 फॅटी ऍसिड विविध पेयांच्या रूपातही घेऊ शकतो. जाणून घ्या, की कुठली पेयं आहेत ज्याच्यातून भरपूर ओमेगा - 3 फॅटी ऍसिड मिळतं. (benefits of omega 3 fatty acid for body)
ऍव्होकॅडो स्मूदी
एव्होकॅडोमध्ये खूप प्रमाणात ओमेगा - 3 फॅटी ऍसिड असतं. याला तुम्ही दूध आणि साखरेसोबत चांगलं ब्लेंड करून प्या. याच्या सेवनानं शरीरातील ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता दूर होईल. (drinks to get omega 3 fatty acid)
सोया मिल्क
तुम्ही शाकाहारी असाल तर सोया मिल्कहून काही चांगलं नसेल. सोया मिल्कमध्ये इतर अनेक पोषकतत्वांसह ओमेगा - 3 फॅटी ऍसिडसुद्धा पुरेशा प्रमाणात असतं. सोया मिल्क आपल्या आहारात आणि डेली रुटीनमध्ये समाविष्ट करा. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये जवळपास १४०० मिलिग्रॅम ओमेगा - 3 असतं. (omega 3 fatty acid for brain)
आक्रोड स्मूदी
आक्रोड शाकाहारी लोकांसाठी ओमेगा - 3 फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यालाही तुम्ही स्मूदीच्या रूपात घेऊ शकता. आक्रोड स्मूदीच्या सेवनानं ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता दूर होईल सोबतच मेंदूच्या विविध समस्याही उद्भवणार नाहीत. ७ आक्रोडांमध्ये जवळपास 2543 मिलिग्रॅम ओमेगा - 3 फॅटी ऍसिड असतं.
कॅनोला ऑईल
कॅनोला ऑईलमध्ये फॅटी ऍसिड खूप असतं. याचा औप्योग आपण कुठल्याही पेयांमध्ये करू शकतो.