OMG : ​हॉलिवूडची ही अभिनेत्री खाते ‘झुरळ’, जाणून घ्या स्टार्सच्या विचित्र खाण्याच्या सवयी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 09:11 AM2017-04-04T09:11:01+5:302017-04-04T14:41:01+5:30

आपल्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी सेलेब्रिटी काहीही खातात, जे सामान्यत: कोणीही खाणे पसंत करणार नाही.

OMG: Bollywood actress 'Jhalal', know the star's extravagant eating habits! | OMG : ​हॉलिवूडची ही अभिनेत्री खाते ‘झुरळ’, जाणून घ्या स्टार्सच्या विचित्र खाण्याच्या सवयी !

OMG : ​हॉलिवूडची ही अभिनेत्री खाते ‘झुरळ’, जाणून घ्या स्टार्सच्या विचित्र खाण्याच्या सवयी !

Next
ong>-Ravindra More
आपल्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी सेलेब्रिटी काहीही करण्यास तयार असतात. त्या असे काहीही खातात, जे सामान्यत: कोणीही खाणे पसंत करणार नाही. काही सेलेब्रिटी अशा खाण्याला हेल्दी राहण्यासाठी गरजेचे मानतात तर काहींना तर अशा खाण्याची सवयच पडली आहे. आपल्या विचित्र खाण्याच्या सवयींबाबत विविध मॅगजीन्सला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सांगितले आहे. याच आधारे जाणून घेऊया या सात सेलेब्रिटींच्या विचित्र खाण्याच्या सवयींबाबत.



१) एंजेलिना जोली
ही अभिनेत्री झुरळ खाणे पसंत करते. तिचे म्हणणे आहे की, झुरळमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 



२) सेलेना गोमेज
हिला पॉपकॉर्नमध्ये लोणचे मिक्स करुन खाणे आवडते. बऱ्याचदा तिला असे खाताना पब्लिक प्लेसवरही पाहण्यात आले आहे. 



३) सिद्धार्थ मल्होत्रा
याला गुलाब जामुनसोबत कैरीचे लोणचे खायायला आवडते. 
 


४) किम कर्दाशियन
ही चारकोल लेमोनेड ड्रिंक रोज पिते. हे ती तिच्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी पिणे पसंत करते.



५) निमरत कौर
ही व्हॅनिला आइस्क्रिममध्ये टोमॅटो सॉसमध्ये मिक्स करु न खाणे पसंत करते. 



६) जितेंद्र
हा टॉयलेटमध्ये पपई खाणे पसंत करतो, त्याच्यामते डायजेशन व्यवस्थित ठेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे.



७) मारिया कैरी
ही आठवड्यातून फक्त तीन दिवस पर्पल रंगाचे जसे वांगी, पर्पल पानकोबी आदी पदार्थ खाणे पसंत करते. तिच्यामते डायटमध्ये यांच्या समावेशाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

Web Title: OMG: Bollywood actress 'Jhalal', know the star's extravagant eating habits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.