OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 10:40 AM2017-02-15T10:40:58+5:302017-02-15T16:16:35+5:30

भारतात प्रत्येक दोन स्तन कॅन्सरग्रस्त स्त्रियांपैकी एकीचा मृत्यू होतोय. जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यामध्ये स्तन कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भारताचा यात पहिला क्रमांक लागतो.

OMG: Breast cancer deaths most in India, world's top! | OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !

OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !

Next
ong>-Ravindra More

भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणात झपाट्याने वाढत आहे. भारतात प्रत्येक दोन स्तन कॅन्सरग्रस्त स्त्रियांपैकी एकीचा मृत्यू होतोय. जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यामध्ये स्तन कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भारताचा यात पहिला क्रमांक लागतो. ही बाब अत्यंत भयावह आहे. ब्रेस्ट कॅन्सर इंडियातर्फे एक माहिती समोर आली आहे, त्यात वर्ष २०१२ मध्ये भारतात १ लाख ४४ हजार ९३७ स्त्रियांना नव्याने स्तन कॅन्सर झाल्याची नोंद आहे. याच वर्षी ७० हजार २१८ महिलांचा स्तन कॅन्सरने मृत्यू झाला. वर्ष २०१५ मध्ये हे प्रमाण खूप वाढले नसले तरी कमी झाले नाही. 

स्तन कॅन्सर होणे जरी आपण थांबवू शकत नाही, मात्र योग्य वेळी निदान व औषधोपचार घेतल्याने मृत्यूदर मात्र निश्चित कमी करता येऊ शकतो. कॅन्सरविषयी जागरूकता पसरवणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाले तर मृत्यूदर कमी करता येऊ शकतो परंतु विश्व आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात ६० टक्के महिलांचा कॅन्सर तिसºया किंवा चौथ्या स्टेजवर लक्षात येतो. अशा रुग्णांना वाचवणे फार कठीण ठरते. विशेष म्हणजे भारतीय स्त्रियांचे स्वत:च्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मुख्य कारण आहे. त्यातच  कौटुंबिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक अडचणींना सामोरे जाताना या स्त्रिया स्वत:च्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अनेक दिवस छातीत वाढत असलेली गाठ दुखत नसल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करतात. नंतर जेव्हा त्रास जाणवायला लागतो तोपर्यंत कॅन्सरची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असते.
 
उपचारादरम्यान केमोथेरपी, रेडिओथेरपी या सगळ्यांमध्ये सहन करावा लागणारा शारीरिक व मानसिक त्रास सोसताना महिलेची व सोबचत कुटुंबियांची अवस्था फार वाईट होते. या सर्व गोष्टी आपल्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर स्वत:ची काळजी घ्यायला शिका. कुटुंबियांकडे लक्ष देणे जशी तुमची जबाबदारी आहे तशीच स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणेदेखील तुमचीच जबाबदारी आहे. आज जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने स्वत:ची व सोबतच अवती-भोवती असलेल्यांची काळजी घेण्याचा निर्धार करूया. 

Also Read : ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित !
                  : ‘ब्रेस्ट कॅन्सर’ वर सोनाचा संदेश !

Web Title: OMG: Breast cancer deaths most in India, world's top!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.