OMG : कंडोम वापरल्याने शरीरावर होतात असेही दुष्परिणाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2017 09:43 AM2017-04-24T09:43:08+5:302017-04-24T15:13:08+5:30

आपणही कंडोमचा वापर करता का? जाणून घ्या कंडोम वापरल्याने काय होते नुकसान !

OMG: The consequences of condom use on the body too! | OMG : कंडोम वापरल्याने शरीरावर होतात असेही दुष्परिणाम !

OMG : कंडोम वापरल्याने शरीरावर होतात असेही दुष्परिणाम !

googlenewsNext
ong>-Ravindra More
म्हणतात की प्रेमाचा अनुभव खूपच आल्हाददायक असतो. यामुळे कायमस्वरुपी दोन व्यक्ती एकमेकांचे होतात. विशेष म्हणजे खरे प्रेम खूप मोठ्या मुश्किलीने मिळते. मात्र ज्याला मिळते तो खूप लकी असतो. 
विशेष म्हणजे काहीजण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सेक्सची मदत घेतात आणि सेक्सच्या साह्याने महिला आणि पुरुष पूर्णत: एकमेकांच्या स्वाधिन होतात. सेक्स दरम्यान अनावश्यक प्रेग्नंसी आणि  लैंगिक आजार टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. मात्र कंडोमच्या वापरानेही नुकसान होते हे आपणास माहित आहे का? 
बहुतेक कंंडोम लेटेक्सचे बनलेले असतात. हा एक तेलगट पदार्थ आहे, जो रबराच्या झाडापासून मिळतो. एका संशोधनानुसार, हा पदार्थ बाहेरील  त्वचेचे संरक्षण करु शकत नाही, यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. शिवाय संक्रमण आणि खाजेच्या समस्याही उद्भवू शकतात. अशा लोकांना सिंथेटिक कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो.
काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जे कंडोम पुरुष वापरतात त्यामुळे महिलांनादेखील धोका निर्माण होऊ शकतो. यावर पावडर आणि लुब्रिकेंटचा वापर केला जात असल्याने ते नुकसानकारक ठरते. यामुळे ओवेरियन कॅन्सर आणि वांझपणादेखील येऊ शकतो असे कित्येक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

Also Read : SEXUAL HEALTH : ​'कंडोम'देखील वाचवू शकत नाही सेक्ससंबंधी ‘या’ समस्यांपासून !

Web Title: OMG: The consequences of condom use on the body too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.