​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 09:28 AM2017-03-21T09:28:28+5:302017-03-21T14:58:28+5:30

आपल्या डोक्यावरील टक्कल आपल्या व्यक्तिमत्वाला मारक ठरतेय?

OMG: Headache baldness, 10 home remedies! | ​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !

​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !

Next
ong>-Ravindra More
पुरुषांमध्ये आढळणारे डिहायड्रोटेस्टोस्टेरोन हार्माेनचे संतुलन बिघळल्याने पुरुषांच्या डोक्याच्या पुढच्या भागाचे केस वेगाने गळतात. सोबतच ही समस्या पुरुषांच्या अनहेल्दी डायट आणि ताणतणावच्या कारणानेही उद्भवते. ही समस्या काही घरगुती उपायाने नियंत्रणात आणली जाऊ शकते. चला जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय.

१) नारळाचे दूध आणि आवळा
नारळाचे दूध, आवळा आणि लिंबूचा रस प्रत्येकी एक-एक चमच घेऊन मिश्रण तयार करा. या मिश्रणाने केसांची किमान ५ मिनिटापर्यंत मसाज करा. त्यानंतर २० मिनिटाने धुवा.

२) मेथीदाणे आणि नारळ तेल
दोन चमच नारळ तेल आणि एक चमच मेथीदाणे एकत्र करुन थोडे गरम करा. थंड झाल्यानंतर डोक्यावर मसाज करा. २० मिनिटाने धुवून टाका. असे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. 

३) मेंदीचे पान
मेंदीचे ८ ते १० पाने मोहरीच्या तेलात टाकून उकाळून घ्या. थंड झाल्यानंतर डोक्याचा मसाज करा. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. 

४) दही आणि बेसन
दोन-दोन चमच दही आणि बेसन एकत्र करा. या मिश्रणाला डोक्याला आणि केसांना लावा. अर्ध्यातासाने धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. 

५) मध आणि आॅलिव्ह आॅइल
दोन दोन चमच मध आणि आॅलिव्ह आॅइल तसेच एक चमच दालचिनी पावडर घेऊन एकत्र करा. या मिश्रणाला संपूर्ण डोक्याला लावा. १५ मिनिटानंतर धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.

६) कांद्याचा रस आणि मध
एक-एक चमच कांद्याचा रस आणि मध घ्या. एकत्र करुन रोज डोक्याला लावा.

७) नारळ तेल आणि आवळा
चार चमच नारळ तेल आणि आवळ्याचे दोन तुकडे एकत्र करुन गरम करावे. या मिश्रणाने रोज डोक्याची मसाज करावी आणि २० मिनिटाने अंघोळ करावी. 

८) अंडे आणि आॅलिव्ह आॅइल
एका अंड्यात दोन चमच आॅलिव्ह आॅइल मिक्स करा. या मिश्रणाला संपूर्ण डोक्याला लावा. ३० मिनिटानंतर धुवा. असे आठवड्यातून दोन ते तिनदा करा. 

९) लिंबू आणि आवळ्याचा रस
लिंबूचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन डोक्याला लावा. अर्ध्यातासाने धुवा. असे आठवड्यातून तिन ते चारवेळा करा. 

१०) बदाम तेल आणि कांद्याचा रस
दोन चमच कांद्याच्या रसात एक चमच बदाम तेल मिक्स करा. या मिश्रणाला डोक्याला लावून रात्रभर राहूद्या. सकाळी धुवा. असे आठवड्यातून दोन ते तिनदा करा. 

Web Title: OMG: Headache baldness, 10 home remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.