OMG : सावळ्या रंगाचेही आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 12:21 PM2017-07-19T12:21:53+5:302017-07-19T17:51:53+5:30

सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे.

OMG: Healthy Benefits Of Sawdish Colors, Awake! | OMG : सावळ्या रंगाचेही आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल थक्क !

OMG : सावळ्या रंगाचेही आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल थक्क !

googlenewsNext
ुतांश लोकांना सावळा रंग आवडत नाही. सावळ्या रंगाचे कुणी पाहिल्यानंतर नाकं मुरडली जातात. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो, त्यामुळे सावळ्या लोकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकजण तर यामुळे डिप्रेशनचेही बळी पडतात. 

आपणास माहित असेल की, फिल्मसृष्टीतही अनेक नायिका सावळ्या रंगाच्या आहेत. मात्र त्यांनी कधीही सावळे असण्याचा नकारात्मक विचार केला नाही. त्यांनी सकारात्मक विचारसरणीने आणि आपल्या अभिनयाद्वारे वेगळी ओळख निर्माण केली. 

पण बऱ्याच सावळ्या मुली त्यांचे अंधानुकरण करुन सावळा रंग घालवण्यासाठी आणि गोरा रंग मिळवण्यासाठी हजारो रूपयांच्या क्रिम बाजारातून विकत घेतात. त्यामुळे गोरा रंग देणाऱ्या क्रिमचं मार्केट वाढलं आहे. 

मात्र सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे.

* सावळ्या किंवा डार्क स्कीनमध्ये कलर पिगमेंट मेलानिनचं प्रमाण जास्त असतं, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

* सावळ्या त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा-वायलेट किरणांपासून आपला बचाव होतो. 

* स्कीनमध्ये असलेल्या डार्क पिग्मेंटेशनमुळे गोऱ्या स्कीनच्या तुलनेत स्कीन कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.

* डार्क स्कीनमध्ये असलेल्या मेलानिन सेंट्रल नर्व्हस सिस्टमला नुकसान पोहोचवणाऱ्या खतरनाक पॅरासाईटपासून आपली रक्षा करतं.

* मेलालिन इन्फेक्शन पसरवणाऱ्या बॅक्टेरियापासून बचाव करतो. गोऱ्या स्कीनच्या तुलनेत स्कीन इन्फेक्शन कमी होतात.

* डार्क स्कीनमध्ये असलेलं मेलानिन स्कीनवर सुरकुत्या येण्यापासून रोखतं. त्यामुळे तुम्ही अधिक यंग आणि ताजेतवाणे दिसता.

* मेलानिनमुळे शरिराची इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी खोकला यांसारखे रोग होत नाही.

* मेलानिन महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्शनमध्ये मदत करतो. यामुळे प्रेग्नसी संबंधीत अनेक समस्यांपासून सुरक्षा मिळते. 

source : india.com

Also Read : ​Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !
                   : ​Beauty : ​सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !

Web Title: OMG: Healthy Benefits Of Sawdish Colors, Awake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.