OMG : पुरुषांनाही ‘या’ कारणाने होऊ शकतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 07:15 AM2017-05-26T07:15:40+5:302017-05-26T12:45:40+5:30

फक्त महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो, असे जर आपणास वाटत असेल तर हा समज आपला चुकीचा ठरु शकतो.

OMG: Men can also get 'breast cancer' due to 'this' cause. | OMG : पुरुषांनाही ‘या’ कारणाने होऊ शकतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’ !

OMG : पुरुषांनाही ‘या’ कारणाने होऊ शकतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’ !

Next
्त महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो, असे जर आपणास वाटत असेल तर हा समज आपला चुकीचा ठरु शकतो. नव्या संशोधनानुसार महिलांच्या तुलनेने पुरुषांमध्ये ही समस्या अधिक गुंतागुंतीची असल्याचे समोर आले आहे. आपण जर विचार करीत असाल की, महिलांसारखी पुरुषांना ब्रेस्ट नसते, तर बे्रस्ट कॅन्सर कसा होऊ शकतो. कदाचित आपणास हे माहित नसेल की, ब्रेस्ट टिश्यूज महिला आणि पुरुष दोघांच्या शरीरात असतात. मात्र महिलांमधील कित्येक प्रकारच्या हार्माेन्समुळे टिश्यूज वाढतात आणि त्यामुळेच ब्रेस्टचा आकारही वाढतो. त्यातुलनेने पुरुषांमध्ये ब्रेस्ट वाढविणारे हार्मोन्स नसतात ज्यामुळे त्यांची छाती सपाट असते. 

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये कॅन्सरचे जीवाणू वाढण्याचा सर्वात जास्त धोका ४० ते ६० वयोगटादरम्यान होतो. 
विशेष म्हणजे जे जास्त मद्यपान करतात, प्रमाणापेक्षा लठ्ठ असतात किंवा ज्यांना लिव्हर संदर्भात काही आजार असेल त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. 

अशा लोकांनी आपल्या छातीच्या आकारात थोडाही फरक जाणवला किंवा एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
शिवाय ज्यांना क्लाइनफेल्टर सिंड्रोमची समस्या आहे त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. कलाइनफेल्टर एका प्रकारचा जीन संबंधीत आजार आहे, ज्यामध्ये पुरुषात एक्स क्रोमाजोमची संख्या जास्त असते. अशा पुरुषांना स्तन कॅन्सरची होण्याची शक्यता १५ ते ५० टक्के जास्त असते. 

Also Read : ​HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !
                   : ​​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!

Web Title: OMG: Men can also get 'breast cancer' due to 'this' cause.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.